लासलगाव : महाराष्ट्रातील तमाम नाभिक समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करावा अथवा अनुसूचित जातीप्रमाणे सवलती मिळाव्यात, या मागणीचे निवेदन लासलगाव येथील नाभिक समाजाच्या महिलांच्या वतीने लासलगावचे मंडल अधिकारी यांना देण्यात आले.लासलगावचे मंडल अधिकारी चंद्रशेखर नगरकर यांना दिलेल्या निवेदनात नाभिक समाजाने विविध मागण्या मांडल्या आहेत. यापैकी नाभिक समाजाला आर्थिक साहाय्य मिळण्यासाठी श्री संत सेना महाराज आर्थिक विकास महामंडळ गठित करण्यात यावे. इतर राज्यांच्या धरतीवर केश कला बोर्डाची स्थापना करावी. तसेच शूर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक प्रतापगड व परिसरात करण्यात यावे यासह व्यवसाय करण्यासाठी शासकीय जागेत गाळा राखीव मिळावा यासह विविध मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे.यावेळी लासलगाव नाभिक समाजाच्या महिला सखी मंचच्या अध्यक्ष उषा मोटेगावकर, मंदाकिनी वाघ, श्रद्धा जाधव, रूपाली वाघ, ज्योती देसाई, वैशाली जगताप, मनीषा वाघ, शोभा देसाई, सोनाली वाघ, ज्योती वाघ, पुष्पा वैद्य, सारिका सुर्वे, प्रतिभा संत, लीला जगताप, अनिल वाघ, अरविंद देसाई, तुषार जगताप, नाना संत, शशिकांत महाले, अभिषेक जगताप, केशव बोराडे, शैलेश संत, रमेश वाघ, अशोक वाघ, अशोक जगताप, मगन आवटे, दिलीप देसाई यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
नाभिक समाजाचे विविध मागण्यांकरिता निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 7:55 PM