नाशिक, दि़१८ - अपार्टमेंट, मग ती सहकारी तत्त्वावरील असो कि खासगी स्वरुपातील़ या अपार्टमेंटच्या देखभाल (मेन्टेनन्स) खर्चासाठी सदस्यांकडून मासिक वर्गणी गोळा केली जाते़ या जमा होणाऱ्या रकमेतून सोसायटीचा देखभाल खर्च भागविला जातो़ शहरातील काही सोसायट्यांचे सदस्य हे नियमितपणे आपला मेन्टेनन्स चेअरमनकडे जमा करतात, मात्र हे प्रमाण खूपच कमी आहे़ तर बहुतांशी सोसायट्यांमधील सदस्य हे मेन्टेनन्स वेळेवर जमा करीत नसल्याने सोसायट्यांची दुरावस्था झाली आहे़ हा प्रश्न केवळ सोसायटीच्या दुरुस्तीपुरता मर्यादित राहिलेला नसून त्याने आता हाणामारी, व त्याहीपुढे जाऊन शस्त्राने वार करण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे़ सोसायटीचा मेन्टेनन्स भरला नाही म्हणून दहा दिवसांपुर्वी उपनगर परिसरातील एका सोसायटीच्या सदस्यावर चाकूहल्ला झाल्याची घटना घडली़ या घटनेवरुन या प्रश्नांची दाहकता लक्षात येत असून याबाबत सोसायटी सदस्यांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे़नाशिक शहराची व्याप्ती ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे़ पूर्वी शहराच्या आजुबाजुचा शेतीचा परिसर आता कमी होत चालला असून त्याजागेवर मोठमोठ्या इमारती उभ्या राहत राहत आहेत़ नागरिकांचा ओढा हा खेड्याकडून शहराकडे येऊ लागल्याने शहरातील जागा ही दिवसेंदिवस कमी पडू लागली आहे़ पूर्वी रो-हाऊस, बंगले यांना प्राधान्य दिले जात असे़ मात्र आता कालौघात त्यांची जागा मोठमोठ्या अपार्टमेंटस्ने व्यापली आहे़एका अपार्टमेंटमध्ये किमान पंधरा ते वीस फ्लॅट काढले जातात़ अर्थात अपार्टमेंटसाठी उपलब्ध होणाऱ्या जागेनुसार फ्लॅटची संख्या अवलंबून असते़ सारासार विचार करता एका छोट्यातल्या छोट्या अपार्टमेंटमध्ये पंधरा ते वीस कुटुंब राहतात़ या अपार्टमेंटचे बांधकाम झाल्यानंतर तसेच त्यातील फ्लॅटची विक्री केल्यानंतर बांधकाम व्यवसायिकाचा रोल संपतो़ व तिथून पुढे त्या सोसायटीतील सदस्यांची रोल सुरू होतो़ या सोसायट्यांचे बांधकाम करताना संपूर्ण फ्लॅटवासियांचा विचार केलेला असतो़ पाणी, वीज, सांडपाणी व्यवस्था केलेली असते़ कालांतराने ही व्यवस्था मोडकळीस आल्यानंतर तिची डागडूजी किंवा नवीन करावी लागते़सोसायटीचा भविष्यातील संभाव्य खर्च करण्यासाठीची तरतूद म्हणजेच मेन्टेनन्स होय़ अर्थात हा मेन्टेनन्स सोसायटीतील सदस्यांनी जमा केला जातो़ प्रत्येक सोसायटीतील सदस्यसंख्येवर तो अवलंबून असतो़ काही सोसायट्यांमध्ये तो २०० ते ५०० रुपयांपर्यंत किंवा त्याहूनही अधिक असू शकतो़ सुरुवातीला सर्वच सदस्य नियमितपणे हा देखभाल खर्च देतात़ मात्र कालांतराने या खर्चाकडे डोळेझाकपणा केला जातो़ त्यामुळे सोसायट्यांना दुरावस्थेला सामोरे जावे लागते व दिवसेंदिवस त्या समस्येमध्ये भरच पडत जाते़ कारण यासाठीच्या खर्चाची तजवीजच नसते़सोसायटीमधील चेअरमनकडे दिला जाणारा मेन्टेनन्स हा त्या सोसायटीच्या भल्यासाठीच असतो़ मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते; परिणामी सोसायटीत निर्माण झालेल्या समस्येमुळे सोसायटीच्या सदस्यांमध्ये हमरी-तुमरी वा मारहाणीचे प्रसंग घडू लागले ंआहेत़ नाशिकरोड परिसरातील उपनगरमध्ये एका सोसायटीच्या सदस्याने मेन्टेनन्स न दिल्याने त्याच्यावर चाकूहल्ला केल्याची घटना दहा दिवसांपुर्वी घडली आहे़सोसायटीच्या मेन्टेनन्सवरून होणाऱ्या या घटना रोखणे गरजेचे आहे़ अर्थात त्यासाठी सर्व सदस्यांनी समंजसपणे आपापली भूमिका निभावणे गरजेचे आहे़ सदस्यांनी वेळच्या -वेळी महिन्याचा मेन्टेनन्स दिल्यास अशा प्रकारच्या घटना निश्चितच घडणार नाहीत़ तसेच सोसायटीच्या सदस्यांमधील वातावरणही खेळीमेळीचे व इमारतीचे आयुष्यही वाढते राहील़उपनगर येथील घटना़़़नाशिकरोड परिसरातील मोरवाडी रोडवर चंद्रभागा सोसायटी असून या सोसायटीच्या मेन्टेनन्सचे पैसे दिले नाही म्हणून एका सदस्यावर चाकूने वार केल्याची घटना शुक्रवारी (दि़१०) घडली़ याबाबत उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंदभागा सोसायटीत दामोदर व यमुनाबाई डांगे हे दाम्पत्य राहते़ शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास संशयित छाया ब्राम्हणे, सुनिता ब्राम्हणे व त्याचे पती तसेच एक तंगम नावाचा इसम यांनी संगनमत करून यमुनाबाई डांगे यांनी सोसायटीच्या मेन्टेनन्सचे पैसे दिले नाही म्हणून कुरापत काढून शिवीगाळ व मारहाण केली़ यामध्ये संशयित सुनीता ब्राम्हणे यांच्या पतीने चाकून युमनाबाई यांच्यावर वार केले तर उर्वरित संशयितांनी घात घुसून मारहाण केल्याची फिर्याद यमुनाबाई डांगे यांनी उपनगर पोलिस ठाण्यात दिली आहे़ या प्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे़
अपार्टमेंटमध्ये धुमसतेय आग रहिवाशांमध्ये बाचाबाची
By admin | Published: October 19, 2014 9:31 PM