नाशिक :पांडवलेणी वर जखमी अवस्थेत अडकलेल्या सिद्धार्थ मोरे (१६) या अल्पवयीन मुलाला इंदिरानगर पोलीस ठाण्याचे बीट मार्शलसह जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या स्वयंसेवकांनी धाव घेत सुरक्षितरित्या ‘रेस्क्यू’ केले.गुरूवारी (दि.२७) सकाळी तीघे मित्र पांडवलेणीवर भटकंती करण्यासाठी आले होते. यावेळी ही घटना पांडवलेणी फिरण्यास पर्यटकांना मुभा दिलेली असली तरी लेणी ओलांडून डोंगराच्या पलीकडे असलेल्या राखीव वनक्षेत्रात घुसखोरी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. राखीव वनात विनापरवाना प्रवेश करणे वन कायद्यानुसार गुन्हा ठरतो. तरीदेखील बहुतांश तरूण, तरूणी, लेणी फिरून झाल्यानंतर डोंगराच्या राखीव वनक्षेत्रात जवाहरलाल नेहरू वनोद्यानाच्या बाजूने प्रवेश करतात. पांडवलेणीचा डोंगर सर करण्याचा प्रयत्नात असलेल्या बहुतांश हौशी तरूणांमुळे प्रशिक्षित गिर्यारोहकांसह पोलिसांचीही डोकेदुखी वाढीस लागत आहे.सिद्धार्थ हा लेखा नगर सिडको येथक्षल स्वप्नील जाधव ,जीवन जाधव यांच्यासोबत पांडवलेणीचा डोंगरा सर करत असताना त्याचा पाय घसरून तो खाली पडला आणि डोक्याला मार लागून बेशुध्द झाला. ही बाब त्याच्या दोघा मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला (१००) संपर्क साधत माहिती कळविली. नियंत्रण कक्षातून तत्काळ बिनतारी संदेश देण्यात आला. इंदिरानगर नगर पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार संतोष पवार यांनी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तातडीने तो संदेश बीट मार्शल राजाराम गांगुर्डे व खुशाल राठोड यांना कळविला. या दोघांसह आपती व्यवस्थापनाचे दयानंद कोळी वैनतेय टीमचे रमेश सोनवणे, जीवन जाधव, अतुल सुलताने हदेखील डोंगरावर दाखल झाले. या सर्वांनी मिळून जखमी अवस्थेत मोरे याला स्ट्रेचरवर टाकून डोंगरावरून खाली आणत रूग्णवाहिकेतून जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. यापुर्वीदेखील अशा घटना घडल्या आहेत. पांडवलेणीच्या पाठीमागे डोंगराचया कपारती दडून बसलेल्या बिबट्याने एका अशाच हौशी तरूणाच्या पाठीवर पंजा मारला होता.
पांडवलेणी सर करताना जखमी झालेल्या मुलाला केले ‘रेस्क्यू’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 4:53 PM
इंदिरानगर नगर पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार संतोष पवार यांनी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तातडीने तो संदेश बीट मार्शल राजाराम गांगुर्डे व खुशाल राठोड यांना कळविला.
ठळक मुद्देडोक्याला मार लागून बेशुध्द झालाराखीव वनात विनापरवाना प्रवेश करणे गुन्हा