वडनेररोड येथील हांडोरे मळा परिसरात मनपाच्या भूमिगत गटार टाकण्याचे काम सुरू आहे. सिमेंटचे पाईप खोल खड्ड्यात टाकताना सुमारे ३० फूट लांब व १५ फूट खोल खड्ड्यात उतरून गुरुवारी दोन मजूर पुढील काम करीत होते. यावेळी अगोदरच्या खोदकामातून निघालेल्या मातीचा भराव मोठ्या प्रमाणात खड्ड्यात कोसळला. यामुळे खोल खड्ड्यातून मजुरांना बाहेर येण्यासाठी वेळही मिळाला नाही आणि दोन्ही मजूर ढिगाऱ्याखाली दबल्या गेले. जवळच असलेल्या जुन्या गटारीला ठिकठिकाणी गळती लागलेली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. यामुळे खोल खड्ड्यात श्वासोच्छवास घेण्यासह अडथळे निर्माण झाले होते. जखमी मजूर पप्पू रामदास आंबोरे (लेखानगर), मंगेश सुभाष गवांदे (रा. चांदोरी) या दोघांना केंद्रप्रमुख अनिल जाधव, फायरमन उमेश गोडसे, श्याम काळे, प्रकाश कर्डक, संजय पगारे, बाजीराव कापसे, आर. बी. जाधव, बंबचालक सदाशिव तेजाळे यांनी शर्थीचे प्रयत्न केले. जवानांनी कृत्रिम प्राणवायू सिलिंडरचा वापर केला तसेच अस्वस्थ झालेल्या जखमींनाही बाहेर काढून सीपीआर देत खासगी रुग्णवाहिकेतून तात्काळ रुग्णालयात हलविले. दोन्ही मजुरांचा जीव वाचल्याने सुमारे तासभर चाललेल्या या रेस्क्यू ऑपरेशनला यश आले.
---
फोटो आर वर ११फायर१/२ नावाने सेव्ह आहे.
===Photopath===
110221\11nsk_37_11022021_13.jpg
===Caption===
रेस्क्यु ऑपरेशन