ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील सोमपूर येथील शेतकरी बांधवांची राहुरी कृषी विद्यापीठाकडून देण्यात आलेल्या मका बियाण्यात मोठी फसवणूक झाल्याने त्यावर चौकशी समिती नेमूनही कुठलाही न्याय न मिळाल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे.राहुरी कृषी विद्यापीठा कडून मोठया अपेक्षेने सोमपुर गावातील शेतकरी बांधवांनी यावर्षीच्या खरीप हंगामात ११६२ किलो मका पिकाचे बियाणे खरेदी करून ५५ हेक्टर क्षेत्रात याची पेरणी केलि मात्र या बियान्याची उगवण क्षमता कमी असल्याने शेतकरी बांधवीच्या अपेक्षेवर पाणी फिरले. याबाबत शेतकरी वर्गाने राहुरी कृषी विद्यापीठ व कृषी विभागाकडे गिरीश नारायण भामरे, रविंद्र दामोदर भामरे, आनंदा उखा भामरे, नारायण संपत भामरे, सुरेश देवराव भामरे, साहेबराव लोटन भामरे, भगवंत लोटन भामरे, अशोक रामदास भामरे, तुकाराम लक्ष्मण भामरे, सुधीर निंबा भामरे, पंकज मनोहर ब्राम्हाणकार, वसंत तुकाराम गोसावी, निंबा चिंतामन भामरे, साहेबराव बुवाजी शेवाळे, केदा दशरथ भामरे, मिथुन पोपटराव भामरे, सदानंद दौलत भामरे,विक्र म शंकर भामरे, एल. बी. खैरनार आदिनी निवेदनाद्वारे तक्र ार केली होती. याची दखल घेऊन मालेगाव कृषी उपविभागीय अधिकारी के. पी. खैरणार यांच्या अध्यक्षतेखाली समतिी नेमन्यात आली. समितीने पाहणी करून दोन महिन्याचा कालावधी लोटला मात्र अद्याप शेतकरी वर्ग झालेल्या फसवणुकीबद्दल न्यायाच्या प्रतिक्षेत बसला आहे. समितीने केलेल्या पाहणीतही मका बियाणेची उगवण क्षमता ५० टक्के, तसेच उगवलेल्या रोपामध्ये मरचे प्रमाण असल्याचे दिसून आले तरीही अद्याप शेतकरी वर्गाला संबधितानी कुठलीही न्याय न मिळाल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
चौकशी समितीकडूनही न्याय न मिळाल्याने संताप
By admin | Published: September 17, 2016 12:12 AM