नायगाव : सिन्नर तालुक्यातील शंभर ग्रामपंचायतींच्या होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकांचे मंगळवार व बुधवारी वार्डनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. सोडतीतून जाहीर झालेल्या आरक्षणामुळे नायगाव खो-यातीत अनेक मात्तबरांच्या मनसुब्यावर पाणी फिरले असल्यामुळे कही खुशी...कही गम अशी परिस्थती निर्माण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय हवा केलेल्या गाव पुढा-यांचा यामुळे चांगलाच हिरमोड झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.गतवर्षाच्या तुलनेत यंदाच्या निवडणूकीत तरूण इच्छुकांची संख्या वाढणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. गाव कारभाराचे मुख्य ( सरपंच ) होण्यासाठी अनेकांनी पुर्वीपासुनच तयारी सुरू केली आहे. दरम्यान, आरक्षणामुळे महिला सदस्यांची संख्या वाढल्याने हिरमोड झालेल्या इच्छुकांनी दुधाची तहान ताकावर भागविण्यासाठी आपल्या सौभाग्य वतींच्या कागदपत्रांच्या जुळवणीसाठी लगबग वाढवली असल्याचे चित्र नायगाव खो-यातील गावांमध्ये दिसत आहे.--------------------------शासनाने ग्रामपंचायतीच्या वार्डनिहाय आरक्षण सोडतीची अमलबजावणी पुर्ण करतांना ज्या-त्या गावामंध्येच ही सोडत ठेवली होती.मात्र प्रत्यक्षात वार्डनिहाय चिठ्ठी पध्दतीने आरक्षण सोडत होणे अपेक्षित असतांना संबंधित अधिका-यांनी तयार करून आणलेल्या आरक्षण सोडतीचे ग्रामस्थांसमोर वाचन करत आपले कर्तव्य पार पाडले. जाहीर केलेल्या अनेक गावांमधील वार्ड आरक्षणात कमालीचे बदल तर अनेक ठिकाणी जैसे-थे च राहिल्याने कही खुशी....कही गम अशी परिस्थती बघायला मिळत आहे.
आरक्षणामुळे गाव पुढाऱ्यांचा हिरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 2:47 PM