शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आधार केंद्राअभावी ग्रामस्थांची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:44 AM

शासनाच्या कुठल्याही योजनेसाठी अत्यंत महत्त्वाचे आधार कार्ड मानले गेले असून, नाशिक तालुक्यातील अनेक गावांमध्ये आधार कार्ड काढण्याची कोणतीही सोय नसल्याने तालुक्यातील पूर्व भागातील ग्रामस्थांचे हाल होत असून, शासनाने शेतकरी, नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी तत्काळ आधार केंद्र सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

गंगापूर : शासनाच्या कुठल्याही योजनेसाठी अत्यंत महत्त्वाचे आधार कार्ड मानले गेले असून, नाशिक तालुक्यातील अनेक गावांमध्ये आधार कार्ड काढण्याची कोणतीही सोय नसल्याने तालुक्यातील पूर्व भागातील ग्रामस्थांचे हाल होत असून, शासनाने शेतकरी, नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी तत्काळ आधार केंद्र सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.नाशिक तालुक्यातील महादेवपूर, गोवर्धन, जलालपूर, चांदशी, दुगाव, गिरणारे, मनोली, सावरगाव, गंगावºहे, महिरावनी, वाडगाव, देवरगाव, धोंडेगाव, खाड्याचीवाडी, इंदिरानगर, नाईकवाडी तसेच इतर लहान-मोठ्या गावातील ४० ते ५० वाडीवस्तीमधील नागरिकांना आधार कार्ड काढण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. ग्रामीण भागातील नागरिकांना १० ते ४० किलोमीटर अंतर कापत आर्थिक भुर्दंड व वेळेचा अपव्यय करून दिवसभर शहराच्या ठिकाणी जाऊन आधार कार्ड काढण्यासाठी वाट पहावी लागत आहे. त्यातही नंबर लागला तर ठीक नाही तर दिवस वाया जाऊन पैसेही पाण्यात जात आहेत. या सर्व गोष्टींचा त्रास नागरिकांना असह्य झाल्याने हीच बाब हेरून युवासेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना नाशिक तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील भागात असलेल्या मध्यवर्ती ठिकाणी अथवा महादेवपूर गावात आधार केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. आधार केंद्र सुरू करण्यात ग्रामीण भागातील नागरिकांवर मोठा अन्याय झाल्याचे यावरून दिसते. यावेळी युवासेनेचे अध्यक्ष नितीन भागवत, शिवशंभू आधार फाउंडेशनचे राजू राथड, संतोष सांडखरे, अनिल पवार, उत्तम भाऊ, नवनाथ आदी उपस्थित होते.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय