शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

कचरा डेपो, स्टेडिअमचे आरक्षण व्यपगत

By admin | Published: February 20, 2016 10:04 PM

पालिकेला झटका : अपील दाखल करण्यापूर्वीच शरणागती

नाशिक : आरक्षित जागांचे संपादन मुदतीत न केल्याने आरक्षण व्यपगत होण्याच्या संख्येत आणखी चार आरक्षित जागांची भर पडली असून, उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कचरा डेपो, स्टेडिअमसह प्राथमिक शाळेच्या आरक्षित जागांवर महापालिकेला पाणी सोडावे लागणार आहे. दरम्यान, सदर आरक्षणांबाबत झालेल्या न्यायनिवाड्यात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केल्यास महापालिकेच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता कमी असल्याचे भाकीत करत प्रशासनाने शरणागती पत्करली आहे.मौजे नाशिक येथील स.नं. ७२५ (पै) मधील १७०० चौ.मी. क्षेत्र उद्यानासाठी तर मौजे नाशिकमधील स.नं. ६४८ / ब मधील चार हजार चौ.मी. क्षेत्र प्राथमिक शाळेसाठी आरक्षित आहे. याशिवाय, मौजे नाशिकमधील स.नं. १९७/ब पै. १९७/१ई पै. मधील २२ हजार ५३३ चौ.मी. क्षेत्र स्टेडियमसाठी तसेच मौजे मखमलाबाद येथील स.नं. ३२५ पै. व इतर २ लाख ८० हजार १०० चौ.मी. इतके क्षेत्र कचरा डेपोसाठी आरक्षित आहे. मात्र, चारही भूसंपादन प्रस्तावात संबंधित जागामालकांनी सदर क्षेत्राचे संपादन मुदतीत पूर्ण न झाल्याने आरक्षण व्यपगत करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने चारही जागा मालकांच्या बाजूने निकाल देत आरक्षण व्यपगत करण्याचा निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्याऐवजी महापालिकेच्या मिळकत विभागाने मात्र अपील दाखल करण्यापूर्वीच शरणांगती पत्करली आहे. महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले तरी मनपाच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता कमी असल्याचे मतही नोंदविले आहे. विनाकारण अपील दाखल करून कालापव्यय करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. सदरचा प्रस्ताव स्थायी समितीवर ठेवण्यात आला असून, स्थायीच्या भूमिकेकडे आता लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)