नाशिक : कोरोनाच्या विषाणू पासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे सर्व स्तरातील अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अश्याकरिता हरी भक्ती धाम सोसायटीच्या रिहवाश्यानी धान्य व किरणामालाची व्यवस्था केली.गेल्या दोन आठवड्याहून अधिक दिवसांपासून राज्यात कोरोनापासून बचाव करण्याकरिता संचारबंदी लागू केली आहे, परिणामी अनेकांचे रोजगार बुडाले, हातावर पोट असल्याचे जगणे कठीण झाले आहे. शिवाय गोर गरिबांची मोठ्या प्रमाणात उपासमार होत असल्याने दिपाली नगर येथील हरी भक्ती धाम सोसायटीतील रिहवास्यानी यथाशक्ती पैसे गोळाकरून मोठ्या प्रमाणात गहू, तांदूळ, डाळी, तेल, तिखट, मीठ आदी आवश्यक वस्तू विकत आणल्या व त्या येथील अनुभव शिक्षा केंद्र या संस्थेच्या माध्यमातून गरजू लोकांपर्यंत पोहोचिवले.या करिता सोसायटीतील परशुराम राऊत, दत्तात्रय जाधव, हरीचंद्र अिहरराव, अरु ण सूर्यवंशी, पवनकुमार शर्मा, निषाद जोशी, मुग्धा कुलकर्णी, निखिल जोशी, दत्ता राऊत, वृषाली जोशी, विशाखा जाधव, विद्या कुलकर्णी, प्रशांत गोसावी आदींनी परिश्रम घेतले.(फोटो १० हरिभक्ती)
हरी भक्ती धामच्या रहिवाश्याचाही गरजूंना मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 5:58 PM
नाशिक : कोरोनाच्या विषाणू पासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे सर्व स्तरातील अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अश्याकरिता हरी भक्ती धाम सोसायटीच्या रिहवाश्यानी धान्य व किरणामालाची व्यवस्था केली.
ठळक मुद्देअनुभव शिक्षा केंद्र या संस्थेच्या माध्यमातून गरजू लोकांपर्यंत पोहोचिवले.