शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

निवासी शाळा शिक्षक, गृहपाल प्रथमच होणार सन्मानित; समाजकल्याण विभागाचा पुढाकार 

By संदीप भालेराव | Published: September 04, 2022 5:38 PM

विभागनिहाय होणार शिक्षकांची निवड.

नाशिक : दरवर्षी शिक्षक दिनी शिक्षकांच्या कार्याचा गौरव म्हणून काही शिक्षकांना सन्मानित केले जाते. जिल्हा परिषद, महापालिका आपल्या आस्थापनांवरील शिक्षकांच्या कार्याची दखल घेते तर काही सामाजिक संस्थांकडून गुरूजनांचा गौरव केला जातो. परंतु समाजकल्याण विभागाच्या निवासी शाळा, शासकीय वसतिगृहातील गृहपाल यांची कधीही दखल घेतली गेली नाही. आता समाजकल्याण विभागाने शिक्षकदिनी अशा मुख्याध्यापक, शिक्षक आणि गृहपालांचा गौरव करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिक्षक दिनी शिक्षण क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व शिक्षकांचा सर्वत्र सन्मान केला जातो. समाज कल्याण विभागातदेखील प्रथमच शिक्षणाचे महत्त्वाचे कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक, शिक्षक व गृहपाल यांचा शिक्षकदिनी सन्मान करण्यात येणार आहे. समाजकल्याण विभागाने या संदर्भातील आदेशही नुकतेच काढले असून निवड प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार विभागस्तरावर त्या त्या विभागातील उत्कृष्ट काम करणारे तीन मुख्याध्यापक, तीन शिक्षक व शासकीय वसतिगृहातील तीन गृहपाल यांची निवड करून त्यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात येणार आहे. सोमवार ५ सप्टेंबर रोजी विभागनिहाय कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत सुरू असणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळा, सफाई व्यवसायातील पालकांच्या मुलांसाठीच्या शासकीय निवासी शाळा व शासकीय वसतिगृह मुख्याध्यापक, शिक्षक आणि गृहपालांना गाैरविण्यात येणार आहे. शिक्षक दिनी या ठिकाणी महापुरुषांचे जीवन व त्यांचे कार्य या विषयावर व्याख्यानांचे आयोजन केले जाणार आहे.डॉ. प्रशांत नारनवरे,समाजकल्याण आयुक्त

टॅग्स :NashikनाशिकTeachers Dayशिक्षक दिन