चौकट -
सहकार निबंधक कार्यालयाच्या वतीने या संदर्भात १ ते १५ जानेवारीदरम्यान हाउसिंग दरबारचे आयोजन करण्यात आले आहे. यात पात्र गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या मालमत्तांचे मानीव अभिहस्तांतरण प्राप्त होण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
कोट -
ग्राहकांना सदनिकांची विक्री केल्यानंतर, तेथे सोसायटी करून देणे विकासकांना बंधनकारक आहे. पूर्वीच्या काळी याबाबत विशेष जागृती नसल्यामुळे किंवा सभासदांच्याही अनास्थेमुळे अनेक सोसायट्यांचे कन्व्हेंस डिड झालेले नाही, अशा सोसायट्यांची संख्या पाच हजारांहून अधिक असण्याचा अंदाज आहे. कन्व्हेंस नसेल, तर सदनिका विक्री आणि हस्तांतरणास अनेक अडचणी येतात. यासाठी कन्व्हेंस डिड करून घेणे महत्त्वाचे आहे. - ॲड. मधुकर फटांगरे, सोसायटी लीगल कन्सल्टंट
कोट-
पूर्वीचा मोफा आणि आताचा रेरा कायद्यान्वये ग्राहकांना पूर्ण संरक्षण देण्यात आलेले असून, विकासकांना कन्व्हेंस डिड करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे विकासक त्यासाठी पूर्ण सहकार्य करतात. जर विकासकाने संबंधित डिड करून दिले नाही, तर सर्व सभासदांना थेट सहकार उपनिबंधकांकडे अर्ज करून या संदर्भात नोंदणी करू शकतात. - अविनाश शिरोडे, बांधकाम तज्ज्ञ