मालेगाव कॅम्प : मालेगावी वीज वितरण कंपनीचे खासगीकरण घोषित झाले आहे. खासगीकरणाला वीज कर्मचारी संघटनांचा तीव्र विरोध होता. यामुळे शेकडो कर्मचारी विस्थापित होणार असल्याचा आरोप संघटनांनी केला व त्या निषेधार्थ आज वीज कंपनीचे मोतीभवन कार्यालय, जुने विद्युत केंद्र (पॉवर हाऊस) येथे संघटनांच्या वतीने द्वार आंदोलन छेडण्यात आले.वीज संघटनांचे कामगार नेते जी. एच. वाघ यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही केंद्रावर आंदोलन झाले. त्यावेळेस वाघ यांनी म्हटले गेल्या दोन वर्षापासून आपण विविध संघटना, राजकीय नेते, आम जनतेला सोबत घेऊन खासगीकरण घेण्यास विरोध केला होता. तरीही वरिष्ठ पातळीवर हालचाली होऊन मालेगावी वीज कंपनीवर खासगीकरण लादले गेले आहे. ते आजही आपणास मंजूर नाही. त्यामुळे आम्ही सर्वांना घेऊन एक पुन्हा जनआंदोलन उभारणार आहोत. खासगीकरणामुळे तिनशेहून अधिक कर्मचारी सुमारे तीस सुरक्षा रक्षक हे विस्थापित होणार असून, अनेकांच्या नोकरीवर गदा येणार आहे. खासगी कंपनीची वीज आम जनतेला परवडणार नाही. त्यामुळे ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. मालेगाव मुस्लीमबहुल, संवेदनशील शहर आहे. त्यांच्या उद्योगधंद्यावर परिणाम होणार असल्याने औद्योगिक शंतता बिघडणार असल्याचे सांगितले. आंदोलनात आनंद गांगुर्डे, ललित वाघसह इतरांनी मार्गदर्शन केले. खासगीकरणास विरोध दर्शविला. आंदोलनात महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, महाराष्टÑ राज्य वीज कामगार महासंघ, विद्युत क्षेत्र तांत्रिक युनिट, महाराष्टÑ राज्य वीज तांत्रिक कामगार, अभियंता असोसिएशन, मागासवर्गीय संघटना या संघटनांचे प्रमुख सदस्य, पदाधिकारी, सदस्य, वीज कर्मचारी उपस्थित होते.
वीज वितरणच्या खासगीकरणास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 1:07 AM
मालेगाव कॅम्प : मालेगावी वीज वितरण कंपनीचे खासगीकरण घोषित झाले आहे. खासगीकरणाला वीज कर्मचारी संघटनांचा तीव्र विरोध होता. यामुळे शेकडो कर्मचारी विस्थापित होणार असल्याचा आरोप संघटनांनी केला व त्या निषेधार्थ आज वीज कंपनीचे मोतीभवन कार्यालय, जुने विद्युत केंद्र (पॉवर हाऊस) येथे संघटनांच्या वतीने द्वार आंदोलन छेडण्यात आले.
ठळक मुद्देमालेगाव : विविध कर्मचारी संघटनांचे मोतीभवनाजवळ आंदोलनं