अंदरसुल : पालखेड कालव्याच्या पोटचारी मधून पाणी घेण्यासाठी ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.बोकटे येथील एप्रिलमध्ये परिसरात यात्रे दरम्यान येणारे आरक्षीत पाणी यावर्षी कोळगंगेचे पात्र रु ंदीकरण व खोलीकरण झाल्यामुळे मिळाले नाही. त्यामुळे बोकटे परिसराला पाणीटंचाईच्या भीषण संकटाला सामोरे जावे लागले. महिलांना पाण्यासाठी दुर दुर भटकंती करावी लागली. जनावरांचा पाण्याचा प्रश्न खूप गंभीर झाल्याने, शेतकऱ्यांना बºयाच अडचणींचा सामना करावा लागला.बोकटे आरक्षीत पाण्यासाठी येवल्यातील नेते, जिल्हा परिषद सदस्य, पालकमंत्री, जिल्हाधिकारआदींच्या प्रयत्नांना यश आले नाही. कारण कोळगंगेचे रुंद व खोल झालेले पात्र या मुळे खूप मोठा पाणीसाठा वाया जातो, असे जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेल्या शिष्टमंडळास निवासी उपजिल्हाधिकारी खेडकर यांनी स्पष्ट सांगून येथून पुढे बोकटे बंधारा एा्रिलमध्ये आरक्षीत ठेवला जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते.प्रशासनाच्या या निर्णयांमुळे बोकटे पंचक्र ोशीला भीषण पाणी टंचाईच कायमच मोठं संकट उभे राहण्यापेक्षा कॅनॉलचे येणारे पाणी चारी (क्र मांक ४५) च्या पोट चाऱ्यांमार्फत मागणी करण्याचा ग्रामसभेत एक मताने ठराव मंजूर झाला ,कारण वन एल चारीच्या सहाय्याने बोकटे येथील बंधारा भरून गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटतो. व टू एल, थ्री एल चारीने खामकर वस्ती बंधारा भरून ग्रामपंचायतीची विहीर करून सायपन गावात आणल्यास पंचक्र ोषीचा पिण्याच्या पाण्याचा कायमचा प्रश्न मिटतो. म्हणून सर्वांनी या ग्रामसभेत एक ऐतिहासिक निर्णय घेतला. एप्रिलमध्ये येणारे पालखेड कालव्याचे रेस मध्ये मिळणारे आरक्षीत पाणी चारी क्र मांक (४५) च्या पोटचाºया क्र मांक वन एल, मार्फत बोकटे येथील कोळगंगेचा बंधारा तर टू एल चारी आणि थ्री एल चारी मार्फत बोकटे पंचक्र ोषीचा सर्वात जास्त महत्वाचा खामकर वस्ती बंधारा भरण्यासाठी सोमवारी (दि.१९) बोकटे येथे ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. त्यासाठी भ्रष्टाचार निर्मुलन समिती, येवला तालुका अध्यक्ष हितेश दाभाडे यांच्यासह प्रकाश दाभाडे, सखाहरी दाभाडे, दामोदर दाभाडे, सचीन खामकर, संदीप साळवे आदि उपस्थित ग्रामस्थांनी बोकटे ग्रामपंचायतीला या संदर्भात ग्रामसभेत निवेदन दिले होते.त्या वेळी उपस्थित बोकटे ग्रामपंचायतच्या महिला सरपंच साधना काले, उपसरपंच प्रताप दाभाडे ग्रामसेवक मोरे,पोलीस पाटील सुरेश मारे, सदस्य ताराचंद मोरे, रामनाथ दाभाडे, आकाश साठे आदींसह उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांनी व ग्रामस्थांनी ठराव मंजूर केला.