शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

महात्मा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:24 AM

महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील विविध शाळांमध्ये प्रतिमापूजन करून आदरांजली वाहण्यात आली. तसेच वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.

नाशिक : महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील विविध शाळांमध्ये प्रतिमापूजन करून आदरांजली वाहण्यात आली. तसेच वेशभूषा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.  नवरचना विद्यालयात महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अहिरे उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आचार्य उपस्थित होते. याप्रसंगी गायकर यांनी महात्मा फुले यांच्या जीवन कार्याची माहिती सांगितली. सूत्रसंचालन तनुश्री बोराडे यांनी केले. प्राची खैरनार यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक व पालक उपस्थित होते.वाघ गुरुजी शाळामविप्र समाज संचलित वाघ गुरुजी शाळेत महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्याध्यापक पुष्पा लांडगे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विशाखा सातपुते यांनी महात्मा फुले यांच्या जीवन चरित्राबद्दल माहिती सांगितली. सर्व विद्यार्थ्यांनी महात्मा फुले यांची वेशभूषा केली होती. तसेच विद्यार्थ्यांसाठी हस्तकला स्पर्धा घेण्यात आली. सूत्रसंचालन कल्पना पाटील यांनी केले. यावेळी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.रचना विद्यालयरचना विद्यालयात महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमास मुख्याध्यापक शीतल पवार, सरोजिनी गोसावी उपस्थित होत्या. यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास यशवंत चौरे, सदावर्ते, बागुल आदी उपस्थित होते.व्हिजन अकॅडमी शाळानाशिकरोड परिसरातील विविध शाळांमध्ये महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.जेलरोड येथील व्हिजन अकॅडमी शाळेत महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या अध्यक्षा अ‍ॅड. अंकिता मुदलियार यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापिका सुनीथा थॉमस यांनी फुले यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. सूत्रसंचालन दीपाली भट्टड व आभार प्रवीण आहिरे यांनी मानले. यावेळी जयश्री बोरोले, मेघा कनोजिया, सुचिता पवार, वृषाली साबरे, पूनम पठान, मयूरी पाठक आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.रंगूबाई जुन्नरे हायस्कूलद्वारका येथील श्रीमती रंगूबाई जुन्नरे इंग्लिश मीडियम प्रायमरी शाळेत मुख्याध्यापिका कल्याणी अग्निहोत्री यांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील शिक्षिका राधिका गवळी यांनी महात्मा फुले यांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी शालेय समिती अध्यक्ष प्रा. दिलीप फडके, कल्याणी अग्निहोत्री, राधिका गवळी आदींसह शिक्षिका उपस्थित होत्या.कमलावती कोठारी शाळाजेलरोड येथील कमलावती कोठारी मुलींची प्राथमिक शाळेत महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापिका सुरेखा बोकडे यांनी पुष्पहार अर्पण केला.यावेळी विद्यार्थिनी आफसा शेख, सृष्टी बोरसे, विशाखा निकम, आर्या खोलमकर, श्रावणी वाघ यांनी फुले यांच्या जीवन कार्याची माहिती दिली. महात्मा फुले यांच्या ‘जीवनातील शेतकऱ्यांची व्यथा’ हे नाटक व गीत तिसरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. शिक्षिका छाया जाधव यांनी फुले यांचा जीवनपट माहितीतून सांगितला. सूत्रसंचालन रेखा पगार व आभार सुनीता सोनगिरे यांनी मानले. यावेळी सुरेखा पाटील, जयश्री भडके, मानसी झनकर, सुषमा यादव, कल्याणी कुºहे, शोभा गरूड आदी उपस्थित होते.सुसंस्कार शाळेत महात्मा फुले यांना अभिवादनपंचवटी हिरावाडी येथील सुसंस्कार बाल विद्यामंदिर शाळेत महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा हिमगौरी अहेर-आडके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्र माला मुख्याध्यापक आशा नाईक, रोहित मोरे, दीपाली पांडव, पी्रतम पवार, विजया महाले, पायल भातमुळे उपस्थित होते.एकवीरा महिला बचतगट४कोणार्कनगर पंचवटी येथील एकवीरा महिला बचतगटातर्फेमहात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोविंदपूर, गंगाम्हाळुंगी येथे आदिवासी वस्तीतील गरीब व गरजूंना कपडे व खाऊचे वाटप करण्यात आले. एकवीरा महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार निर्मिती, स्वयंव्यवसायास प्रोत्साहनपर मार्गदर्शन असे विविध सामाजिक उपक्र म राबविले जातात. यावेळी एकवीरा महिला बचत गटाच्या अध्यक्षा शारदा प्रतीके, उपाध्यक्ष जयश्री कोटनाके, सचिव अरु णा गेडाम यांसह बेबीताई दिवे, निर्मला दिवे, शोभा सोनवणे, दीपमाला उईके, सोनाली कोडपे, पूनम सोनवणे, शिवानी सोळंके, अंजली उईके आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा