सायखेडा : छोडकर सारे काम-चलो करो मतदान, मतदान राजा जागा हो-लोकशाहीचा धागा हो, ना जाती वर ना धर्मावर-बटन दाबा कामावर, नवे वारे, नवी दिशा-मतदान आहे. उद्याची दिशा, अशा घोषणांनी शनिवारी (दि.२३) सायखेडा परिसरातील सर्व गावात जिल्हा परिषदेच्या शाळेतील विध्यार्थ्यांनी मतदान जागृती फेरी काढून जनजागृती केली, त्याला भरपूर प्रतिसाद लाभला.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशावरून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळेत मतदान जागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी दोन दोन मिळून गावातून फेरी मारली हातात. मतदान जागृती संदर्भात घोषवाक्य लिहिलेले फलक, विद्यार्थ्यांच्या आवाजातील घोषणा, शिक्षकांचे मतदारांना जागृती संदर्भात उदभोदन यांनी गावागावातील परिसर दणाणून गेला होता. सामान्य माणसाला मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी या उपक्र माची अंमलबजावणी करण्यात आली. गावातील प्रमुख रस्त्यांवर विद्यार्थ्यांची निघालेली रॅली पाहून अनेक लोकांना कुतूहल वाटले. अनेकानीं कोणते मतदान, कधी आहे मतदान अशी विचारणा केली, लहान मुलांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या उपक्र माला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उपक्र मात सायखेडा केंद्रातील औरंगपूर, भेंडाळी, निपाणी पिंपळगाव, महाजनपुर, सायखेडा, तळवाडे, चाटोरी, हाळोटी माथा, रामनगर, गोदानगर, सोनगाव, गंगावाडी, गणपीर वाडी, खालकर वस्ती, तुंबडे वस्ती, लिंबालवन वस्ती, कारे वस्ती या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, सहभागी झाले होते.निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशावरून सायखेडा केंद्रातील २० शाळेतील विद्यार्थ्यांनी आपाआपल्या गावात मतदान जागृती निर्माण करण्यासाठी फेरी काढून मतदारांना जागृत केल. घोषवाक्य आणि हातात झलकणारे फलक यामुळे लोकांपर्यंत मतदान आले असल्याची माहिती पोहचली, सर्व विध्यार्थी, शिक्षक यांनी सहभाग घेतला.ओंकार वाघकेंद्रप्रमुख, सायखेडा.औरंगपूर येथे विद्यार्थ्यांनी गावातून मतदान जागृती फेरी काढून जागृती निर्माण करतांना केंद्रप्रमुख ओंकार वाघ, विद्यार्थी, पालक, शिक्षकवृंद.