नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवनतर्फे आयोजित पावसाळी कविता गायन स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेचे उद्घाटन कवी उत्तम कोळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोळगावकर म्हणाले, इंटरनेटच्या मायाजालात पालक आणि विद्यार्थीही वाचनाचे, पाठांतराचे महत्त्व विसरले आहे. स्पर्धेत विविध शाळांमधील ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी एकाहून एक सरस कविता सादर केल्या. याप्रसंगी कवी किशोेर पाठक, सावानाचे पदाधिकारी बी. जी. वाघ, प्रकाश वैद्य, दिगंबर आडके, अनुप्रिता पांगारकर, उत्तरा चंद्रात्रे, अनिता नगरकर, दीपक जहागीरदार आदी उपस्थित होते. संजय करंजकर यांनी प्रास्ताविक केले. स्वाती पाचपांडे यांनी सूत्रसंचालन केले. गीता बागुल यांनी आभार मानले. अंतिम निकाल मंगळवारी (दि.१७) रोजी जाहीर करण्यात येईल.
बालभवनतर्फे आयोजित कविता गायन स्पर्धेस प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:51 AM