दिंडोरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णांना रक्त मिळणे आवश्यक असून या कालावधीत रक्ताचा तुटवडा होऊ नये म्हणून दिंडोरी शहरात समता ब्लड बँक व देवाज ग्रुप व दिंडोरी शहरातील युवकांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.यात ४५ नागरीकांनी रक्तदान केले.या शिबिराचे उदघाटन तहसिलदार पंकज पवार, माजी नगराध्यक्ष सचिन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अतुल वाघ यांनी प्रथम रक्तदान केले. यावेळी समता ब्लड बँकेच्या वतीने डॉ. खान, डॉ. शाम बडगुजर यांच्यासह त्यांचे सहकारी यांनी रक्तदान प्रसंगी नियोजन केले.शिबिरप्रसंगी, सचिन जाधव, सचिन शिंदे ,गणेश कापसे, सचिन खोटे, रवि देशमुख, मनसे तालुका अध्यक्ष अमोल ऊगले, योगेश बोराडे, दिपक जाधव, गणेश पगार, अमोल मवाळ, अभिजित देशमुख, सागर बोरस्ते, मयुर देशमुख, भाऊ वडजे, शिवा घडवजे, सागर दंडगव्हान, मुन्ना दंडगव्हान, नितीन देशमुख आदी उपस्थित होते.
दिंडोरीतील रक्तदान शिबिराला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 4:06 PM
दिंडोरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णांना रक्त मिळणे आवश्यक असून या कालावधीत रक्ताचा तुटवडा होऊ नये म्हणून दिंडोरी शहरात समता ब्लड बँक व देवाज ग्रुप व दिंडोरी शहरातील युवकांच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.यात ४५ नागरीकांनी रक्तदान केले.
ठळक मुद्देयुवकांचा पुढाकार :४५ रक्तदात्यांनी घेतला सहभाग