पेठ : राज्य शासकिय- निमशासकीय कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी पुकारलेल्या संपाला पेठ तालुक्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शासकिय कार्यालयासह शाळा १०० टक्के बंद ठेवण्यात आल्या होत्या.पेठ तालुका समन्वय समितीच्या वतीने नायब तहसीलदार वराडे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जुनी पेन्शन हक्क संघटन, प्राथमिक शिक्षक संघ, आदिवासी शिक्षक संघटना, अपंग कर्मचारी संघटना, आश्रम शाळा शिक्षक संघटना यांचे सह कर्मचारी,शिक्षक, शिक्षकेत कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. शासकिय कामकाजाचा पहिलाच दिवस असल्याने ग्रामीण भागातून विविध शासकिय कामानिमित्त नागरिक आले होते. मात्र कार्यालयात शुकशुकाट असल्याने नागरिकांना रिकामा हाती परत जावे लागले. तालुक्यातील शाळाही बंद ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांना लागोपाठ सुट्टी मिळाली.
पेठ तालुक्यात शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 4:16 PM
कामकाज ठप्प : एकच मिशन-जुनी पेन्शनचा नारा
ठळक मुद्देतालुक्यातील शाळाही बंद ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांना लागोपाठ सुट्टी मिळाली.