कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोविड लसीकरण वितरणाचे काम प्रगतीपथावर असून ज्या व्यक्तीस कोरोनाची लक्षणे दिसून येत आहे, तसेच सर्दी, खोकला आदी लक्षणे आढळल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करण्यात येऊन लस देण्यात येणार आहे. धामणी येथे पहिल्या टप्प्यात जवळपास १७० नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभाग घेत प्रतिसाद दिला. यावेळी लसीकरणाआधी नागरिकांची आरोग्यसेविकांमार्फत मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी करण्यात आली.
---
धामणी येथे लसीकरण मोहिमेत सहभागी झालेले सरपंच बन्सी गोडेसमवेत उपसरपंच गौतम भोसले, वैद्यकीय अधिकारी डॉ. शेगावकर, डाॅ. संदीप वेढे, डाॅ. अश्विनी सानप व इतर आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी. (२८ नांदूरवैद्य १)
===Photopath===
280421\28nsk_5_28042021_13.jpg
===Caption===
२८ नांदूरवैद्य १