दि. २२ रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यूचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शंभर टक्के सहभाग नोंदवला. दररोज सकाळी सात वाजता करण्यात येणारे दूध वाटप पहाटे पाच-सहा वाजताच करण्यात आले तर ग्रामपंचायतीने देखील दररोजचा गावासाठी होणारा सात वाजेचा पाणीपुरवठा सकाळी सहा वाजताच केला. गावातील व वाडी वस्तीवरील किराणा दुकाने, हॉटेल, सलून,रसवंती दिवसभर बंद ठेवण्यात आली होती. तसेच दररोज हाताला काम मिळेल या अपेक्षेने धावपळ करणाऱ्या मजूरांनी कामावर न जाता घरीच थांबणे पसंत केले. शेतकरीवर्गाने कामे बंद करून दिवसभर घरात टीव्ही पाहत किंवा झाडाच्या सावलीखाली विश्रांती करत दिवस घालविणे पसंत केले. यावेळी मोबाइलवरून एकमेकांची विचारपूस करतांनाचेही चित्र दिसून येत होते. त्याचप्रमाणे मेंढपाळांनीदेखील आपापल्या वाड्यांवरच थांबणे पसंत केले. त्यामुळे खामखेडा गावाजवळून जाणारे सर्व रस्ते ओस पडल्याचे दिसत होते.
खामखेड्यात जनता कर्फ्यूला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 4:52 PM