चांदवड : येथील नेमिनाथ जैन संचलित एच.एच.जे.बी. तंत्रनिकेतनच्या यंत्र अभियांत्रिकी विभागातर्फे प्रश्नमंजूषा व मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेसाठी नाशिक व परिसरातील पदविका महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास सतीश मणियार मॅनेजिंग डायरेक्टर आॅफ टेक्नोकॅड सोल्युशन नाशिक तसेच कापसे, (असिस्टंट प्रोफेसर व टीपीओ) एस.एन.जे.बी. अभियांत्रिकी चांदवड प्रामुख्याने उपस्थित होते. युगांत अर्जुन दाघुळे (गुरुकुल तंत्रनिकेतन, नांदगाव) यास प्रथम पारितोषिक मिळाले तसेच अमित कसौधन (लोकनेते गोपाळराव गुळवे तंत्रनिकेतन नाशिक) यास द्वितीय पारितोषिक मिळाले. रोहित विश्वास जाधव (एच.एच.जे.बी. तंत्रनिकेतन, चांदवड) यास तिसऱ्याक्रमांकाचे पारितोषिक मिळाले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
प्रश्नमंजूषा स्पर्धेला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2020 10:15 PM
नेमिनाथ जैन संचलित एच.एच.जे.बी. तंत्रनिकेतनच्या यंत्र अभियांत्रिकी विभागातर्फे प्रश्नमंजूषा व मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.
ठळक मुद्देचांदवड : एस.एन.जे.बी. तंत्रनिकेतन