कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्याने आरोग्य विभागाने पेठ तालुक्यात लसीकरण मोहिमेकडे लक्ष केंद्रित केले आहे. तालुक्यात ७ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी लस उपलब्ध असताना ग्रामीण भागात पसरलेले गैरसमज व अफवा यामुळे नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी येत नसल्याचे लक्षात आल्यावर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. योगेश मोरे यांनी गावोगाव जाऊन लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. यामुळे लसीकरण करून घेणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे.
इन्फो...
यांनी केली जनजागृती...
ग्रामीण भागातील जनतेत निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी आरोग्य विभागाकडून आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, प्राथमिक शिक्षक यांनी घरोघरी जाऊन जनजागृती केली. श्रमजीवी संघटना, जल परिषद परिवार, सोशल नेटवर्किंग फोरम, महाएनजीओ फाउंडेशन, माणदेशी फाउंडेशन, यशोदीप संस्था यांच्यासह डॉ. उद्धव चौधरी, कवी देवदत्त चौधरी यांनी आपआपल्या पद्धतीने ग्रामीण जनतेच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
फोटो - २४ पेठ १
तिरडे येथील उपकेंद्रात लसीकरण करताना आरोग्य कर्मचारी.
===Photopath===
240521\24nsk_25_24052021_13.jpg
===Caption===
तिरडे येथील उपकेंद्रात लसीकरण करतांना आरोग्य कर्मचारी.