भूषण गवई : नवनियुक्त न्यायमूर्तींच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रतिपादन
नाशिक : देशातील प्रत्येक नागरिकाचा भारतीय न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे़ या विश्वासास पात्र ठरण्याची जबाबदारी न्यायसंस्थेची आहे़ तसेच न्यायापासून शेवटचा घटकही वंचित राहणार नाही, प्रत्येकास न्याय मिळवून देण्याचे कर्तव्य न्यायाधीश व वकिलांचे आहे, असे मार्गदर्शन उच्च न्यायायलाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात केले़नाशिक जिल्हा वकील संघासह तालुका वकील संघाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या नवनियुक्त न्यायमूर्तींच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते़ गवई पुढे म्हणाले की, समाजातील अगदी शेवटच्या घटकासही न्याय मिळाला पाहिजे़ वकील व न्यायाधीश या दोहोंनी न्याय मिळवून देण्याचे कर्तव्य पार पाडले पाहिजे़ नाशिक जिल्हा न्यायालयात गृह विभागाच्या ताब्यातील अडीच एकर जागा मिळाली असून, या जागेवर बांधकाम करण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन गवई यांनी दिले, तर न्यायमूर्ती मोरे यांनी प्रलंबित प्रकरणे निकाली लावण्यासाठी, तसेच जलद न्याय देण्यासाठी न्यायाधीश व वकील या दोघांचेही सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले़हिंदू वारसा कायद्याबाबत विचारमंथनप्रथम चर्चासत्र महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष तथा पुण्यातील ज्येष्ठ वकील सुधाकर आव्हाड यांनी हिंदू वारसा कायद्यातील कलम चार, कलम सहा, कलम आठ, कलम १९ व कलम तीस यासंदर्भात उच्च व सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निवाड्यांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केले़ वडिलोपार्जित संपत्तीतील वारसांबाबतच्या संकल्पनेस सर्वोच न्यायालयाने उत्तम सिंगविरुद्ध सुभाग सिंग या खटल्या दिलेल्या निर्णयामुळे तडा गेला़ वारसांना कोणत्या परिस्थितीत कसे अधिकार प्राप्त होतात याबाबत सविस्तर माहिती आव्हाड यांनी दिली, तर पॅनलमधील अॅड़जालिंदर ताडगे, अॅड़ बी़ के़चौरे, अॅड़अण्णासाहेब भोसले यांनी विविध प्रश्न उपस्थित केले़