नाशिक : नाशिकहून बीड, नांदेड, हिंगोलीकडे जाणाऱ्या बसेसना तेथील निर्बंधांमुळे विश्रांती देण्यात आली असून या गाड्या तात्पुरत्या बंद करण्यात आलेल्या आहेत. नंदुरबारलाही शनिवार, रविवार पूर्णपणे लॉकडाऊन असल्याने दोन दिवस नंदुरबारला जाणाऱ्या बसेस थांबविण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, गुजरातकडे जाणाऱ्या बसेसना देखील ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे नाशिकमधून अशा ठिकाणी जाणाऱ्या बसेस तात्पुरत्या बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. बीड, नांदेड या ठिकाणी २६ तारखेपासून लॉकडाऊन पुकारण्यात आलेला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात नाशिकमधून या ठिकाणी जाणाऱ्या बसेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
नाशिकमधील नांदगाव डेपोतून परळी येथे बस सोडली जाते. ती आता बंद करण्यात आलेली आहे. नंदुरबारमध्ये शनिवार आणि रविवार पूर्णपणे लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे या जिल्ह्यात जाणाऱ्या बसेस देखील या दिवशी धावणार नाहीत.
गुजरातमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला एनटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आल्यामुळे गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील कमी झाल्याने या मार्गावर धावणाऱ्या बसेस कमी होण्याची शक्यता आहे. नाशिकहून सुरतला चार, वापीला पाच, तर अहमदाबादला २ अशा गाड्या धावतात. आता गुजरातमध्ये जाण्यासाठी चाचणी अनिवार्य असल्याने प्रवाशांमध्ये देखील संभ्रमावस्था आहे. विशेष म्हणजे ज्या प्रवाशांनी गुजरातला जाण्यासाठी बसचे आरक्षण केले होते, त्यांनी चाचणी केली नसल्याने त्यांची आरक्षण रद्द केले आहे.
--इन्फेा--
जिल्ह्याचे उत्पन्न घटले
मागील वर्षीच्या आर्थिक संकटातून एस.टी. महामंडळ सावरत असतानाच एस.टीला पुन्हा एकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. तब्बल आठ महिन्यांनंतर बससेवा सुरू झाली असताना हळूहळू प्रवाशी संख्या देखील वाढत होती. मात्र आता काेरोनाचा कहर पुन्हा झाल्याने जिल्हांतर्गत बसेसचे प्रवासी देखील घटले आहेत. कसेबसे ५० ते ५५ टक्क्यांपर्यंत प्रवासी संख्या वाढलेली असताना आता ३५ ते ४० टक्के इतकेच प्रवासी प्रवास करीत आहेत.
हिंगोली बंद
बीड परळी नांदगाव डेपोची गाडी बंद
नंदुरबार शनिवार, रविवार बंद पुकारण्यात आलेला आहे. त्यामुळे तेथील गाड्या बंद
गुजरात
सुरत-४, वापी-५, अहमदाबाद-२
सुरत गाडीचे आरक्षण रद्द
चालक, वाहकांना कितीदा करावी लागणार
--इन्फो--
१५ टक्के उत्पन्न घटले