नाशिक : गंजमाळ येथील भीमवाडीत शनिवारी लागलेल्या आगीत सुमारे ११२ संसारांची राख झाली. आगीच्या घटनेमुळे हादरलेल्या कुटुंबीयांच्या काळजातील धग दुसºया दिवशीही दिसून आली. आगीमुळे अख्खे घर भस्मसात झाले असतानाही त्या राखेतून जिवापाड जपलेल्या संसाराच्या आठवणी जमा करताना काहींच्या डोळ्यातील अश्रूही थांबत नव्हते.गंजमाळ येथे लागलेल्या भीषण आगीनंतर येथील कुटुंबीयांचे भालेकर शाळेत तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहेत.घटनेच्या दुसºया दिवशी अनेकजण पुन्हा आपल्या बेचिराख झालेल्या झोपड्यांमध्ये जाऊन उरला-सुरला संसार गोळा करत होते. घरातील मोठ्यांपासून लहानगेही राखेच्या ढिगाºयातून आपल्या आठवणी शोधत असताना त्यांचे पाणवलेले डोळे त्यांच्या यातनांना जणू वाट मोकळी करून देत होते.मिळेल ते साहित्य घेऊन पुन्हा आपल्या निवाºयाकडे परतणारे तर काहींचे पावले तिथेच थबकले होते.
...उरल्या सुरल्या संसारासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 12:05 AM
गंजमाळ येथील भीमवाडीत शनिवारी लागलेल्या आगीत सुमारे ११२ संसारांची राख झाली. आगीच्या घटनेमुळे हादरलेल्या कुटुंबीयांच्या काळजातील धग दुसºया दिवशीही दिसून आली. आगीमुळे अख्खे घर भस्मसात झाले असतानाही त्या राखेतून जिवापाड जपलेल्या संसाराच्या आठवणी जमा करताना काहींच्या डोळ्यातील अश्रूही थांबत नव्हते.
ठळक मुद्देभीमवाडी आग : घटनेच्या दुसऱ्या दिवशीही दु:खाची धग