लोकमत न्यूज नेटवर्कवणी : सकाळी, सायंकाळी व रात्रीच्या सुमारास थंडीचे वातावरण असल्याने मार्च महिन्यात डिसेंबर महिन्याच्या थंडीचा अनुभव येत आहे, मात्र बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत.सध्या दिंडोरी तालुक्यातील वातावरण कमालीचे बदलले आहे. सकाळी, सायंकाळी व रात्री प्रचंड थंडीचा अनुभव येत असून अडगळीत पडलेले उबदार कपडे परिधान करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. सध्याचे असमतोल वातावरण द्राक्षबागांना मारक आहे. यामुळे द्राक्षवेलांची पाने खराब होणे व द्राक्षातील साखरेचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे द्राक्षांच्या चवीत फरक पडून त्याचा परिणाम मागणीवर होण्याची भीती आहे. दरम्यान, स्थानिक बाजारपेठांमध्ये ३५ ते ४५ रु पये प्रतिकिलोने प्रतवारी व दर्जा पाहून व्यापारी द्राक्षे खरेदी करीत आहेत.६५ ते ७५ रु पये किलोचा दर निर्यातक्षम द्राक्षांना मिळत आहे. सध्या मिळणारा दर हा गेल्या काही दिवसात मिळालेल्या दरापेक्षा कमी आहे. त्यात वातावरणात बदल झाल्याने उत्पादकांची चिंता वाढली आहे. आर्थिक गणितात द्राक्षे महत्त्वाचा भाग असतो व वार्षिक गणित यावर अवलंबून असते. प्रतिकूल स्थिती निर्माण झाल्याने उत्पादक अस्वस्थ झाले आहेत.
बदलत्या वातावरणामुळे अस्वस्थता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2020 12:10 AM
वणी : सकाळी, सायंकाळी व रात्रीच्या सुमारास थंडीचे वातावरण असल्याने मार्च महिन्यात डिसेंबर महिन्याच्या थंडीचा अनुभव येत आहे, मात्र बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत.
ठळक मुद्देद्राक्ष पिकावर संकट । साखरेचे प्रमाण कमी होण्याची भीती