नाशिक - आगारटाकळी परिसरातील श्री गोमय मारुती देवस्थान मठाचा तीनदिवसीय जीर्णोद्धार सोहळा संत-महात्मे व मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असून बुधवारी (दि.८) कळस आणि महावस्त्राचे स्वागत करण्यात आले. नाशिक शहरात श्री समर्थ रामदास स्वामींनी स्वहस्ते स्थापन केलेला गोमय मारुती हा आगारटाकळी येथील मठात आहे. या मंदिराचा गेल्या साडेतीन वर्षांत देणगीदारांचे कोट्यवधी रुपयांचे योगदानातून जीर्णोद्धार करण्यात आला आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी शासनाचे पर्यटन खात्यामार्फत रुपये तीन कोटी ८४ लाखांचा निधी परिसर विकासासाठी दिला आहे. या जीर्णोद्धार सोहळा शनिवारपासून होणार आहे. या तीन दिवसांत याठिकाणी वास्तुशांती, सहस्त्र कुंभाभिषेक व कलशारोहण असे कार्यक्रम होणार आहे. सोमवार (दि. १३) डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता प.पू. प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्या हस्ते मंदिराचे कलशारोहण होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री समर्थ रामदास स्वामींचे वंशज प.पू. भूषण स्वामी तसेच समर्थ सेवा मंडळाचे प. पू. योगेश बुवा, प. पू. गोविंद देवगिरी महाराज ऊर्फ आचार्य किशोरजी व्यास आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या मंदिरासाठी प.पू. प्रसाद महाराज
अमळनेरकर यांनी कळस देणगी दिला असून या कळसाचे आणि धनंजय पुजारी यांनी दिलेल्या महावस्त्राचे अर्चना रोजेकर, राजश्री शौचे, जुन्नरे कुलकर्णी यांनी औक्षण केले आणि विश्वस्त सुधीर शिरवाडकर, ज्योतिराव खैरनार, ॲड. भानुदास शौचे यांनी स्वागत केले. जीर्णोद्धार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री मारुती देवस्थान आणि राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी मठ याचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश एस.टी. त्रिपाठी यांच्यासह सुधीर शिरवाडकर, ज्योतिराव खैरनार, प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, तहसीलदार अनिल दौंड यांच्यासह विश्वस्त मंडळाने केले आहे.
छायाचित्र ०८ टाकळी नावाने सेव्ह...