नाशिक : रेमडेसिविरप्रमाणेच टोसिलीझुमॅब हे इंजेक्शनदेखील कोरोना रुग्णांना लवकर बरे करण्यासाठीचा पर्याय म्हणून वापरात येत होते; मात्र आता त्या इंजेक्शनच्या टोसिलीझुमॅबच्या वाटपावरदेखील निर्बंध घालण्यात आले असून, रेमडेसिविरप्रमाणेच नाशिकच्या तीन विभागात समन्यायी पद्धतीने त्याचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्यावतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. टोसिलीझुमॅबच्या मागणीत गत महिनाभरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्राप्त होणारा टोसिलीझुमॅबच्या इंजेक्शनचा साठा सुयोग्य पात्र रुग्णांना वाटप होण्यासाठी शासनाने आदेश निर्गमित केले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या लक्षात घेऊन संबंधित जिल्ह्यांतर्गत वितरण सक्रिय रुग्णसंख्येनुसार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रेमडेसिविरप्रमाणे नाशिक महापालिका, मालेगाव महापालिका आणि नाशिक ग्रामीण अशा तीन भागांमध्ये करण्यात आलेली जिल्ह्याची विभागणी या इंजेक्शनच्या वाटपासाठीही कायम राहणार आहे. ४३ टोसिलीझुमॅब इंजेक्शनचे वाटपमनपा क्षेत्रात ५५ टक्के सक्रिय रुग्णांचे प्रमाण असून, एकूण २३ टोसिलीझुमॅब इंजेक्शनचे वाटप करायचे होते. ते सर्वच्या सर्व इंजेक्शनचे वाटप करण्यात आले, तर नाशिक ग्रामीण क्षेत्रात एकूण ४० टक्के सक्रिय रुग्णांचे प्रमाण असून एकूण १८ टोसिलीझुमॅब इंजेक्शनचे वाटप करावयाचे होते. मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात ५ टक्के सक्रिय रुग्णांचे प्रमाण असून, एकूण ०२ टोसिलीझुमॅब इंजेक्शनचे वाटप करायचे होते. त्या सर्व रुग्णांना टोसिलीझुमॅब इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.मनपा क्षेत्रात ५५ टक्के रुग्णजिल्ह्यात सध्या नाशिक मनपा क्षेत्रात सुमारे ५५ टक्के रुग्ण तर ग्रामीण भागात ४० टक्के रुग्ण असून, मालेगाव मनपा क्षेत्रात ५ टक्के रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे त्यानुसारच टोसिलीझुमॅबच्या वाटपाचेही नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी नाशिक मनपाचे वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि मालेगाव मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्यासारख्या सक्षम अधिकाऱ्यांचीदेखील वाटप देखरेखीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
टोसिलीझुमॅबच्या वाटपावरही जिल्हा प्रशासनाकडून निर्बंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 1:22 AM
रेमडेसिविरप्रमाणेच टोसिलीझुमॅब हे इंजेक्शनदेखील कोरोना रुग्णांना लवकर बरे करण्यासाठीचा पर्याय म्हणून वापरात येत होते; मात्र आता त्या इंजेक्शनच्या टोसिलीझुमॅबच्या वाटपावरदेखील निर्बंध घालण्यात आले असून, रेमडेसिविरप्रमाणेच नाशिकच्या तीन विभागात समन्यायी पद्धतीने त्याचे वाटप करण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे रेमडेसिविरच्या धर्तीवर जिल्ह्याच्या तीन विभागांत आवश्यकतेनुसार वाटप