शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

साडेसहा कोटींच्या एनपीएमुळे इंडिपेंडेंस बँकेवर निर्बंध ; सहा महिने कोणत्याही खात्यातून पैसे काढण्यास बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 8:08 PM

इंडिपेंडेंस को-ऑपरेटिव्ह बँकेचे एनपीए ठेवीच्या तुलनेत दीडपटीने वाढल्याने बँकेच्या ६ हजार २२९ खातेदारकांना पैसे काढण्यावर सहा महिन्यांसाठी बंदी घातली आहे. बँकेत सुमारे ४ कोटींच्या ठेवी असून एनपीए झालेल्या कर्जांची रक्कम तब्बल ६ कोटी ८२ लाखांपर्यंत असल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इंडिपेंडेंस को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादले आहे.

ठळक मुद्दे इंडिपेंडेंस को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध ठेवीच्या तुलनेत दीडपट एनपीए बँकेचे ६ हजार २२९ खातेदार अडचणीत

नाशिक : शहरातील इंडिपेंडेंस को-ऑपरेटिव्ह बँकेचे एनपीए ठेवीच्या तुलनेत दीडपटीने वाढल्याने बँकेच्या ६ हजार २२९ खातेदारकांना पैसे काढण्यावर सहा महिन्यांसाठी बंदी घातली आहे. बँकेत सुमारे ४ कोटींच्या ठेवी असून एनपीए झालेल्या कर्जांची रक्कम तब्बल ६ कोटी ८२ लाखांपर्यंत असल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने इंडिपेंडेंस को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादले आहे.

नाशिकमधील इंडिपेंडेंस को-ऑपरेटिव्ह बँकेची शहरात एकमेव शाखा असून बँकेने तब्बल ८ कोटी २५ लाखांचे कर्ज वाटप केले आहे तर बँकेच्या ६ हजार २२९ खातेधारकांचे जवळास ४ कोटी रुपये या बँकेत अडकून पडले आहेत; परंतु, बँकेतील ९९.८८ टक्के ठेवीदार हे पूर्णपणे डिपॉझिट इंश्योरन्स ॲन्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन विमा योजनेच्या चौकटीत असल्याचा त्यांचे पैसे सुरक्षित आहेत. त्यामुळे निर्बंध येताच प्रत्येकवेळी बँँकेत होणारी गर्दी यावेळी फारशी दिसून आली नाही. आरबीआयने इंडिपेंडेंस को-ऑपरेटिव्ह बँकेमधून पैसे काढण्यास घालण्यात आलेली बंदी ही सहा महिन्यांसाठी असून या कालावधीत बँकेचे एनपीए झालेली कर्जवसुलीवर भर देऊन बँकेला पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया बँकेचे व्यवस्थापक नवेद पठाण यांनी दिली. दरम्यान, बँक निर्बंधांनंतरही बँकिंग व्यवहार सुरू ठेवू शकणार असल्याचे स्पष्ट करतानाच रिझर्व्ह बँक परिस्थितीनुसार निर्बंधांमध्ये दुरूस्तीही करण्याचे संकेतही दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठेवींच्या बदल्यात कर्जफेड शक्यआरबीआयने दिलेल्या निर्देशनानुसार, बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता ठेवीदारांना बचत किंवा चालू खाते तसेच अन्य कुठल्याही खात्यामधून जमा रकमेमधील कुठलीही रक्कम काढण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे बँकेतील ठेवीदार हे ठेवींच्या बदल्यात आरबीआयच्या अटींचे पालन करून कर्जाची फेड करू शकणार आहेत. आरबीआयच्या मान्यतेशिवाय बँकेला कुठलेही कर्ज देता येणार नाही तसेच कुठल्याही कर्जाचे नूतनीकरण करता येणार नाही. बँक कुठलीही गुंतवणूक किंवा कुठल्याही रकमेची फेड करणार नाहीत. 

टॅग्स :bankबँकNashikनाशिकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक