नाशिक- जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या कमी केल्याने गेल्या १२ मे पासून बारा दिवसांसाठी सुरू करण्यात आलेली कडक अंमलबजावणी सोमवारपासून शिथील करण्यात येणार आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज प्रशासनाच्या आढावा बैठकीत ही माहिती दिली. मात्र राज्य सरकारने ब्रेक दि चेन अंतर्गत लागु केलेल्या अन्य निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही भूजबळ यांनी सांगितले.पालकमंत्री भुजबळ यांनी आज दुरदृष्य प्रणाली व्दारे मुंबई येथून नाशिकमधील यंत्रणेची काेरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली.राज्य सरकारने ५ एप्रिल पासून ३१ मे पर्यंत ब्रेक द चेन अंतर्गत अनेक निर्बंध लागु केले असले तरी प्रशासनाने १२ ते २३ मे दरम्यान बारा दिवस कडक लॉकडाऊन पाळण्याचे ठरवले होते. नागरीकांना केवळ वैद्यकीय कारणासाठी बाहेर पडण्याची मुभा देण्यात आली हेाती. तसेच बाजारपेठा, व्यापार तसेच कृषी उत्पन्न बाजार समित्या देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. या दरम्यान कोरोना बाधीतांची संख्या आणखी कमी झाली आहे. त्यामुळे २३ तारखेनंतर कडक लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्योग आणि कृषीउत्पन्न बाजार समित्या नियमांच्या आधीन राहून सुरू करण्यास परवानगी देण्याच्या सूचना भुजबळ यांनी दिल्या.
नाशिकमध्ये निर्बंध २३ मे नंतर शिथील होणार; पालकमंत्री छगन भुजबळ यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 8:33 PM