नाशिक : एनपीएचे वाढलेले प्रमाण नियंत्रणात आल्याने रिझर्व्ह बँकेने दि. २ एप्रिल २०१३ मध्ये श्री गणेश सहकारी बँकेवरील निर्बंध शिथिल केले असून, बँकेला दैनंदिन व्यावहार पूर्वीप्रमाणे सूरू करण्यास परवानगी दिलीआहे. त्यामुळे बॅँकेच्या सुमारे बारा हजार खातेदार आणि ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.बँकेचे चेअरमन शरद कोशिरे यांनी शुक्रवारी (दि.२९) पत्रकार परिषदेत दिली.श्री गणेश बँकेतील कर्जदारांच्या थकबाकीमुळे एनपीएचे प्रमाण ५६ टक्के झाल्याने रिझर्व्ह बँकेने दि. २ एप्रिल २०१३ बँकेच्या दैनंदिन व्यवहारावर निर्बंध लादले होते. त्यामुळे खातेदारांना आपल्याच खात्यावरून रक्कम काढण्यास प्रतिबंध करण्यात आल्याने ठेकेदार हवाल दिल झाले होते. विशेष म्हणजे नाशिकमध्ये यापूर्वी अडचणीत आलेल्या बॅँका एकतर मोठ्या बॅँकेत विलीन झाल्या अथवा अवसायानात निघाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर गणेश बॅँक बचावल्याने ठेवीदार आणि खातेदारांच्या दृष्टीने ही सर्वात महत्वाची घटना आहे.२०१३ मध्ये रिझर्व बॅँकेने निर्बंध घातले तेव्हा त्यावेळी बँकेचा एकूण एनपीएच ३६ हजार कोटी होता. या परिस्थितीत बँकेने थकबाकीदार कर्जदारांवर कडक३८ कोटी नऊ लाख रुपये वितरीतगणेश सहकारी बँकेने २ एप्रिल २०१३ रोजी निर्बंध आल्यानंतर आरबीआयच्या सूचनेनुसार खातेदारांना टप्प्याटप्पयाने १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम परत केली आहे. यात सुरुवातीला १ हजार रुपये, त्यानंतर २० हजार, ३० हजार, २० हजार, २० हजार व १० हजार अशा क्रमाने ही रक्कम परत करण्यात आली असून, आतापर्यंत १२ हजार २४ ठेवीदार/खातेदारांना ३८ कोटी ९ लाख रुपये परत केल्याची माहिती बँकेच्या संचालकांनी दिली.
श्री गणेश बँकेवरील निर्बंध शिथिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 1:13 AM