नाशिक : कें द्र सरकारने जुन्या हजार व पाचशे रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर या नोटा बँकांमध्ये तथा पोस्टामध्ये जमा करण्याची मुदत शुक्रवारी (दि. ३०) संंपुष्टात आली आहे; मात्र बँकांमधून पैसे काढण्यावर निर्बंध कायम आहे. त्यामुळे येत्या नवीन वर्षातही विविध क्षेत्रांतील नोकरदार वर्गाला सरकारच्या नोटाबंदीच्या झळा सहन कराव्या लागणार आहेत. जुन्या पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटांपैकी हजाराची नोट कालबाह्य झाली असून, पाचशेच्या नवीन नोटा संपूर्ण रूप पालटलेल्या अवस्थेत नागरिकांच्या हातात पडत आहेत. तर जुन्या नोटा आता केवळ रिझर्व्ह बँकेने निर्देशित केलेल्या केंद्रांवर जमा करता येणार आहे. त्यासाठी ३१ मार्चपर्यंत अखेरची मुदत आहे. तसेच अशा नोटा बाळगणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार असून, दहा पेक्षा जास्त नोटा बाळगणाऱ्यांना अशा कारवाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे अनवधानाने अथवा काही कारणास्तव हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बँकेत जमा न करू शकलेल्या नागरिकांना या नोटा ३१ मार्चपर्यंत रिझर्व्ह बँकेने निर्देशित केल्या केंद्रांवर जमा करून आयुष्यातील कमाई सुरक्षित करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
पैसे काढण्यावर निर्बंध कायम
By admin | Published: December 31, 2016 12:09 AM