नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या बस सध्या कोरोना निर्बंधांमुळे पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे साहजिकच गाड्यांबरोबरच ईटीआयएम मशिन्सचा वापरही कमी झाला आहे. वापराअभावी अनेक मशिन्स नादुरुस्त झाल्या असल्या तरी चालकाला चांगल्या स्थितीतील तिकीट (ईटीआयएम) मशिन्स देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात सध्या केवळ ४०० ते ४५० बस सुरू असल्याने तिकीट मशिन्सचाही वापर कमी झाला आहे. जिल्ह्यासाठी सुमारे दोन हजारांच्या पुढे मशिन्स असून, वापर केवळ हजार मशिन्सचा होत आहे. वापर नसल्याने मशिन्समध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात सध्या ७१० तिकीट मशिन्स विविध कारणास्तव बंद असून, त्या दुरुस्तीबाबतची कार्यवाही सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
--इन्फो--
जिल्ह्यातील एकूण एसटी बस : ८६५
सध्या सुरू असलेल्या बस : ४८९
तिकीट काढण्याच्या एकूण इलेक्ट्रॉनिक्स मशिन्स : २४८५
सध्या बंद असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स मशिन्स : ७१०
--इन्फो--
काय म्हणतेय आकडेवारी
आगारात एकूण ईटीआयएम मशिन्सची संख्या नादुरुस्त ईटीआयएम मशिन्सची संख्या
नाशिक-१ ४७६ १६८
नाशिक-२ ४७१ १००
मालेगाव १६९ ३०
मनमाड १४४ ३४
सटाणा १८० ४६
सिन्नर २०३ ६४
नांदगाव १०३ ४८
इगतपुरी १०२ ६४
लासलगाव १०८ २३
कळवण २०० ७४
पेठ १०३ ०९
येवला १०१ ११
पिंपळगाव १२५ ६९
--इन्फो---
दुष्काळात तेरावा...
केारोना निर्बंधांमुळे पूर्ण क्षमतेने बस सुरू नसल्याने साहजिकच उत्पन्नावर देखील परिणाम झाला आहे. आलेल्या उत्पन्नाच्या माध्यमातून केवळ डिझेलचा खर्च भागवला जात असून, इतर खर्च करणे देखील कठीण आहे. अशातच मशिन्स नादुरुस्त झाल्याने त्यावरील खर्च करण्याची वेळ आल्याने तूर्तास आवश्यक असेल तेव्हढ्याच मशिन्सचे मेन्टनन्स करण्याला प्राधान्य दिले जात आहे. एकूण मशिन्सच्या दहा टक्के अधिक मशिन्स उपलब्ध असल्याचा दावाही नाशिक विभागाने केलेला आहे.
--इन्फो--
पगार मिळताेय हेच नशीब
आर्थिक संकटाचा सामना करावा लागणाऱ्या एस.टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांना शासनाच्या निधीमुळे पगार तरी मिळत आहे. जून, जुलै महिन्याचे वेतन शासनाच्या आर्थिक पॅकेजमुळे मिळाले आहे. आता थोडेफार उत्पन्न येत असल्याने पुढील महिन्यात पगाराची अडचण येणार नाही, असे कर्मचारी वर्गाकडून सांगण्यात आले.