नाशिक : मुळबाळ होत नाही या कारणावरून सतत शिवीगाळ व मारहाण केल्यानेच मुलीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असून यास तिचा पती व सासरकडील नातेवाईक जबाबदार असल्याची फिर्याद अबिदा तांबोळी (मु़पो़ करंजगाव, ता़निफाड, जि़नाशिक) यांनी कोनगाव पोलीस ठाण्यात दिली आहे़
तांबोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी अनिसा हिचा नऊ वर्षांपुर्वी अश्फाक इस्माईल तांबोळी (रा़ ड्रिम कॉम्प्लेक्स, फ्लॅट नंबर ३, म्हात्रे चाळ, ता़भिवंडी) सोबत झाला होता़ विवाहानंतर प्रथम एक ते दोन वर्षे सासरच्यांनी मुलीला चांगली वागणूक दिली़ मात्र, त्यानंतर तुला मुलबाळ होत नाही, तु वांझोटी आहे, आमच्या मुलाला तुझ्याशी विवाह करावयाचा नव्हता असे सांगून शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरूवात केली़ याबाबत मुलीने वारंवार सांगितले मात्र तिची व सासरच्यांची समजूत घालून तिला सासरी पाठवित होतो़
पती अश्पाक तांबोळी, सासला ईस्माईल तांबोळी व सासू जायदाबाई तांबोळी हे अधिक छळ करून लागल्याने चार महिन्याुपुर्वी अनिसा माहेरी आली असता तिला वडीलांनी सासरी नेऊन सोडले व त्रास न देण्याबाबत सांगितले़ मात्र त्रास वाढतच असल्याने २८ आॅगस्ट रोजी तिने राहत्या घरी विषारी औषध सेवन केले़ तिच्यावर ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना २ सप्टेंबरला तिचा मृत्यू झाला़
सासरच्यांच्या छळामुळेच मुलीने आत्महत्या केल्याचे अबिदा तांबोळी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून कोनगाव पोलिसांनी तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़