नाशिक : सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातील ‘मून विदाउट स्काय’ आणि ‘उत्तरदायित्व’ या नाटकांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ज्या केंद्रावर १५ किंवा त्यापेक्षा जास्त नाट्यप्रयोग सादर होतील त्या केंद्रावरील दोन नाटके अंतिम फेरीसाठी पाठविण्याचा प्रस्ताव सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने निकाल जाहीर होण्यास विलंब होत होता. या सूचनेची शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने दखल घेत बुधवारी (दि. २९) नव्या सूचनांचा अध्यादेश जारी केल्यानंतर रात्री उशिरा नाशिक केंद्राचा निकाल जाहीर करण्यात आला. मून विदाउट स्काय या नाटकाने दिग्दर्शनाच्या पहिल्या पारितोषिकासह प्रकाश योजना, नेपथ्याचे प्रथम, तर अभिनयात रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेअंतर्गत दि. ६ ते २५ नोव्हेंबर या दृष्टिक्षेपात निकालप्रकाश योजना :प्रथम- प्रफुल्ल दीक्षित (मून विदाउट स्काय), द्वितीय- रवींद्र रहाणे (उत्तरदायित्व)नेपथ्य :प्रथम- लक्ष्मण कोकणे (मून विदाउट स्काय), द्वितीय- नीलेश राजगुरू (उत्तरदायित्व)रंगभूषा :प्रथम- माणिक कानडे (...आणि धम्म), द्वितीय : दर्शना क्षेमकल्याणी (श्यामची आई)