नाशिक : नाशिक जिल्हा ई.पी.एफ. पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने जिल्ह्यातील १८६ सेक्टरमधील सर्व निवृत्त कर्मचारी व त्यांच्या कार्यरत असलेल्या संघटना रस्त्यावर उतरणार आहेत. राज्यात केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानांसमोर निदर्शने करण्याचा ठराव यावेळी संमत करण्यात आला. येत्या २९ रोजी गोल्फ क्लब मैदान येथून मोर्चा काढण्यात येणार आहे.
प. सा. नाट्यगृह येथे झालेल्या या पेन्शनर्स परिषदेत दहा ठराव संमत करण्यात आले होते. यावेळी राजू देसले, चेतन पनेर, सुभाष काकड, प्रकाश नाईक, श्रीकांत साळसकर, शिवाजी ढोबळे, रमेश सूर्यवंशी, डी. बी. जोशी, बापू रांगणेकर, एम. एन. लासूरकर, सुभाष पाटील, सुभाष शेळके, भाऊसाहेब शिंदे, सुभाष काकड, बालाजी साळी, एम. भार्गवन, निवृत्ती शिंदे, रमेश पाध्ये, साहेबराव शिवले, विलास विसपुते, नामदेवराव बोराडे, कृष्णा क्षीरसाठ, व्ही. डी. धनावटे, एन.के. कांबळे, नईम शेख आदी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेत सर्व ई.पी.एफ. पेन्शनर्सला दरमहा ९ हजार पेन्शन व त्यावर महागाई भत्ता देण्यात यावा, कोशियारी समितीच्या शिफारशीनुसार इंटरीम महागाई भत्त्यासहीत द्यावे, सुप्रीम कोर्टातील पेन्शनर्स विरोधी सर्व केसेस मागे घ्याव्यात, एक्झमेंटेड युनिटसह सर्व पात्र पेन्शनरांना त्यांच्या पूर्ण पगारावर पेन्शन महागाई भत्त्यासहीत द्यावे, २०१४ पासून लागू केलेली पेन्शन प्रो.राटा पद्धत बंद करा, पेन्शनरांना क्रॉनिक सिकनेस सहित मोफत औषधोपचार सुविधा लागू करा, सर्व (९५) ई.पी.एफ.च्या निवृत्त पेन्शनरांना बस प्रवासात सवलत द्यावी असे ठराव करण्यात आले.
८) (९५) ई.पी.एफ. पेन्शनरांना अन्न सुरक्षा कायद्यात सामील करा.
९) १८६ युनिटमधील सर्व कर्मचाऱ्यांना ई.पी.एफ. (९५) योजनेत सामील करून पेन्शनचा मोबदला द्या.
१०) ईपीएस ९५ पेन्शनर्सला ९ हजार रुपये महागाई भत्त्यासह पेन्शन मागणी करण्यात आली आहे. नाशिक येथे दि २९ मार्च २०२२ रोजी सकाळी गोल्फ क्लब मैदान नाशिक येथून निघणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय एकमताने घेतला. या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
ऑल इंडिया कोर्डिनेश कमिटी ऑफ ई.पी.एफ. (९५) पेन्शनर्स असोसिएशनचे राष्ट्रीय समन्वयक अतुल दिघे, नाशिक जिल्हा ई.पी.एफ. पेन्शनर्स फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजू देसले यांनी मार्गदर्शन केले.