नायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील आदर्श मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार केला.देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन १७ वर्ष देशसेवा करून पुन्हा आपल्या जन्मभूमीत आलेल्या जवानाचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादन संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे होते. यावेळी जवान काकड यांनी आपल्या सेवा कार्यकाळातील अनेक सुख-दुखाच्या गोष्टी कथन केल्या. काकड हे गावातील तिसरे सेवानिवृत्त सैनिक असून देशसेवा करण्याची त्यांच्या रूपाने गावाला मिळालेली संधी ग्रामस्थांना सुखावणारी असल्याचे दिघोळे यांनी यावेळी सांगितले.यावेळी आदर्श कला, क्रि डा व सांस्कृतिक मित्र मंडळाचे सोमनाथ चेवले, माजी उपसरपंच कैलास गिते, सचिन दिघोळे, संदिप दिघोळे, जयराम गामणे, संभाजी गायकवाड, गोविंद दिघोळे, राम दिघोळे, दशरथ दिघोळे, सदाशिव गायकवाड, समाधान दिघोळे, ज्ञानेश्वर चेवले, हर्शद दिघोळे, किशोर दिघोळे, विश्वास सानप, उत्तम आव्हाड आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सेवानिवृत्त सैनिक काकड यांचा ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 5:32 PM
नायगाव : सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील आदर्श मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार केला.
ठळक मुद्देजवान काकड यांनी आपल्या सेवा कार्यकाळातील अनेक सुख-दुखाच्या गोष्टी कथन केल्या.