देवळा तालुक्यात एकूण पाचशे सेवानिवृत्त नागरिक आहेत. त्यातील बहुतेक व्यक्तींना उतारवयात मधुमेह , ह्रदयविकार तसेच अन्य शारीरीक व्याधी जडलेल्या आहेत. त्यासाठी त्यांना सातत्याने व नियमतिपणे वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात . यासाठी दरमहा मिळणाºया निवृत्तीवेतनातील ठराविक रक्कम औषधोपचारांसाठी खर्च करावी लागते. परंतु निवृत्तीवेतनाच्या अनियमिततेमुळे या ज्येष्ठ व्यक्तींना दरमहा औषधाचा खर्च करणे कठीण झाले असून उपचार थांबविण्याची वेळ आली आहे . आर्थिक गणित चुकल्याने वेळेवर उपचार घेता येत नसल्याने त्यांच्या तब्येतीवर विपरीत परीणाम होत असून आरोग्याच्या नवीन समस्या उद्भवू लागल्या आहेत. याचबरोबर हातात हक्काचा पैसा नसल्याने त्यांच्यावर लाचार होण्याची वेळ आली असून कुटूंबात मानसिक कुचंबणा होत आहे. स्वतंत्रपणे राहणाºया निवृत्त व्यक्तींची अवस्था तर अतिशय बिकट झाली आहे. दरमहा पाच तारखेच्या आत पेन्शन मिळावी अशी मागणी तालुका पेन्शनर्स संघटनेने केली आहे.
निवृत्तीवेतनाच्या अनियमिततेमुळे सेवानिवृत्तांची परवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 5:43 PM