नाशिक : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठूमाउलीच्या भेटीसाठी त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची पालखी घेऊन गेलेल्या संस्थानकडून शिवशाही बसचे प्रवासभाडे आकारणी राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक आगाराला महागात पडली आहे. नाथांकडून प्रवासभाडे वसूल केल्याने वारकरी सांप्रदायात प्रचंड रोष व्यक्त झाल्यानंतर आगारावर संस्थानला प्रवासभाड्याचा धनादेश परत करण्याची नामुष्की ओढवण्याबरोबरच शासनाकडून केल्या जाणाऱ्या कारवाईला सामोरे जाण्याची वेळही आली आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी या साºया प्रकाराबाबत खेद व्यक्त केला असून, संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.कोरोनामुळे यंदा पंढरपूरच्या आषाढीवारीवर निर्बंध आले. त्यामुळे महाराष्टÑातील प्रमुख संतांच्या मानाच्या पालख्या पंढरपूरला विठूमाउलीच्या भेटीसाठी नेण्याकरिता शासनाने शिवशाही बस उपलब्ध करून दिल्या होत्या. परंतु, राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक आगाराने त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तिनाथ महाराजांची पालखी पंढरपूरला घेऊन जाण्यासाठी संस्थानकडून ७१ हजार रुपयांचे भाडे वसूल केले होते. त्यासंबंधीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर महाराष्टÑातील वारकरी बांधवांनी महामंडळाच्या या असंवेदनशीलतेवर कोरडे ओढले. सोशल माध्यमातूनही महामंडळावर प्रचंड रोष व्यक्त झाला. या साºया प्रकाराची दखल राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी घेतली आणि खेद व्यक्त करत त्यांनी भाड्याची रक्कम संस्थानला परत करण्याचे आदेश काढले. त्यानुसार, मुंबईतील परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून नाशिक आगाराला आदेश मिळाले आणि विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी तातडीने त्र्यंबकेश्वर गाठत संस्थानला प्रवासभाड्याचा रिटर्न चेक देऊन दिलगिरी व्यक्त केली. संस्थानने दिलेला धनादेश वटला गेल्यामुळे महामंडळाला स्वत:चा धनादेश तयार करून द्यावा लागला. पुजारी जयंत महाराज गोसावी यांनी सदर धनादेश स्वीकारत महामंडळाला आभारपत्र दिले.संतांच्या पालख्या शिवशाही बसने मोफत घेऊन जाण्याच्या स्पष्ट सूचना दिलेल्या असतानाही नाशिक आगाराने भाडे वसूल करणे चुकीचे होते. वारकऱ्यांकडून पैसे घेणे खेदजनक आहे. यामध्ये जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.- अनिल परब, परिवहनमंत्रीशासनाकडे आम्ही बस मोफत मिळण्यासाठी विनंतीपत्रे दिली होती. परंतु, जिल्हा प्रशासनाकडून तसा कुठलाही आदेश नसल्याचे सांगण्यात आल्याने संस्थानने प्रवासभाडे भरले होते. महामंडळाने आता पैसे परत केले आहेत. विठूमाउलीनेच त्यांना सुबुद्धी दिली.- पवनकुमार भुतडा, अध्यक्ष, निवृत्तिनाथ संस्थान, त्र्यंबकेश्वर
निवृत्तिनाथांना प्रवासभाड्याचा ‘रिटर्न चेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 12:33 AM
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठूमाउलीच्या भेटीसाठी त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची पालखी घेऊन गेलेल्या संस्थानकडून शिवशाही बसचे प्रवासभाडे आकारणी राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक आगाराला महागात पडली आहे. नाथांकडून प्रवासभाडे वसूल केल्याने वारकरी सांप्रदायात प्रचंड रोष व्यक्त झाल्यानंतर आगारावर संस्थानला प्रवासभाड्याचा धनादेश परत करण्याची नामुष्की ओढवण्याबरोबरच शासनाकडून केल्या जाणाऱ्या कारवाईला सामोरे जाण्याची वेळही आली आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी या साºया प्रकाराबाबत खेद व्यक्त केला असून, संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
ठळक मुद्देलोकमतचा दणका : एसटी महामंडळाला सुबुद्धी; परिवहन मंत्र्यांकडून खेद व्यक्त; संबंधितांवर करणार कारवाई