शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

गिते व बागुल यांच्या शिवसेनेतील घरवापसीने राजकीय वर्तुळ पूर्ण मस्ती सोडून, गळतीची कारणे भाजप शोधणार का ?

By किरण अग्रवाल | Published: January 10, 2021 1:04 AM

पक्ष सोडून गेलेल्यांकडे दुर्लक्ष करणे कसे महागात पडते हे गेल्यावेळी महापालिकेच्या सत्तेत राहिलेल्या ह्यमनसेह्णने अनुभवले आहे. तीच चूक विद्यमान सत्ताधारी भाजप करणार असेल तर त्यांच्याकडूनच शिवसेनेला ह्यअच्छे दिनह्ण दाखविण्यासाठीचा तो पुढाकार ठरेल.

ठळक मुद्देभाजपच्या होऊ शकणाऱ्या नुकसानीबद्दल चिंता व्यक्त होणे स्वाभाविक या दोघांनी द्रोह करावा हा भाजपसाठी धक्काच दोघांना गमावल्यावर तरी भाजप सुधारणार आहे का? गळतीच्या कारणांकडे गांभीर्याने लक्ष पुरवावे लागेल

सारांशपक्षाच्या बळकटीकरणासाठी म्हणून पक्षांतरे घडून येतात हे खरेच; पण यात पक्षाबरोबरच त्या संबंधित व्यक्तीच्या लाभाचे गणित व त्यांनी सोडलेल्या पक्षाचे नुकसान अधिक महत्त्वाचे असते हे अंतिम सत्य आहे; त्यामुळे नाशकात शिवसेनेत सुरू झालेल्या भरतीच्या परिणामांचा विचार करताना भाजपच्या होऊ शकणाऱ्या नुकसानीबद्दल चिंता व्यक्त होणे स्वाभाविक ठरावे.

माजी आमदार वसंत गिते व सुनील बागुल या दोन्ही नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश करून भाजपला धक्का दिला आहे. हा धक्का वगैरे नसल्याचा आव भाजपकडून आणला जात आहे, पण ते उसने अवसान म्हणायला हवे कारण हा धक्काच आहे. गिते व बागुल हे दोन्हीही स्थानिक पातळीवर प्रभाव राखणारे नेते आहेत म्हणून भाजपत गेल्यावर त्यांना थेट प्रदेशच्या उपाध्यक्षपदी संधी दिली गेली होती, इतकेच नव्हे तर महापालिकेत भाजपच्या पहिल्या अडीचकीच्या टर्ममध्ये गिते यांचे पुत्र प्रथमेश यांना, तर दुसऱ्या टर्ममध्ये बागुल यांच्या मातोश्री श्रीमती भिकूबाई बागुल यांना उपमहापौरपदाची बक्षिसी देण्यात आली. अलीकडेच जुन्या निष्ठावंतांना डावलून भाजयुमोचे शहराध्यक्ष पद त्यांच्या घरात देण्यात आले. असे असताना या दोघांनी द्रोह करावा हा भाजपसाठी धक्काच आहे.

कुणी कितीही लवचीक होण्याचा प्रयत्न केला तरी आपल्या मूळ स्वभाव व सवयीत फार बदल घडवून आणता येत नाही. भाजपने भरपूर देण्याचा प्रयत्न केला तरी गिते व बागुल तेथे रमू शकले नाहीत ते त्यामुळेच, कारण आक्रमकता व उत्स्फूर्ततेला तेथे संधीच नव्हती. अर्थात गिते शिवसेनेतून बाहेर पडून मनसेत गेले, तिथे या स्वभाव व सवयीला मोडता घालण्याची वेळ फारशी आली नव्हती; तरी तिथे टिकू शकले नाही व अखेरीस भाजपमार्गे शिवसेनेत परतले. बागुलही व्हाया राष्ट्रवादी व भाजप मार्गे सेनेत परतले त्यामुळे या दोघांचे राजकीय वर्तुळ पूर्ण झाले आहे. याचा फायदा पक्षाला व या दोघा नेत्यांनाही होईलच; पण या दोघांना गमावल्यावर तरी भाजप सुधारणार आहे का?

नाशकात भाजपचे तीन आमदार व महापालिकेत सत्ता असली तरी संघटनात्मकदृष्ट्या या पक्षातील निर्नायकी अवस्था लपून राहिलेली नाही. त्यामुळेच आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भ्रष्टाचाराचे बोल लावलेल्या स्वपक्षाच्या माजी आमदार बाळासाहेब सानप यांना पुन्हा पक्षात घेतले गेले. अर्थात, राजकारणात असे येणे-जाणे चालत असते त्यामुळे त्याबद्दल आक्षेप असण्याचे कारण नाही. प्रश्न आहे तो इतकाच की, महापालिकेतील सत्तेच्या मस्तीतून बाहेर पडून पक्षाला लागू पाहणाऱ्या गळतीबद्दल गांभीर्याने हा पक्ष व त्याचे नेते विचार करणार आहेत की नाही?

सोडून गेलेले बुडत्या नावेत बसले हे म्हणणे सोपे. तसे म्हणणे परिस्थितीतून उद‌्भवलेल्या अपरिहार्यतेचा भाग असते. पण अशांच्या जाण्याने गळती लागून आपलीच नाव बुडणार नाही ना, याची काळजी कोण घेणार? बाहेरून आलेल्यांच्या पुन्हा बाहेर पडण्याने म्हणजे गळतीने पक्षातील निष्ठावंतांना सुगीचे दिवस येतील हे जरी खरे असले तरी तेवढ्यावर महापालिकेतील सत्ता पुन्हा पुढच्यावेळी राखता येईल का, या प्रश्नाचे उत्तर समाधानकारकपणे देता येणार नसेल तर या गळतीच्या कारणांकडे गांभीर्याने लक्ष पुरवावे लागेल, अन्यथा हे राम म्हणण्याची वेळ येणे अटळ समजायला हवे.

शिवसेनेत आता नेतेच झाले अधिक...काँग्रेस व राष्ट्रवादीकडे कार्यकर्त्यांपेक्षा नेत्यांचाच पक्ष म्हणून पाहिले जाते, तीच गत आता शिवसेनेची होऊ घातली आहे. राज्यातील सत्तेच्या अनुषंगाने बदललेली गणिते लक्षात घेता या पक्षात इन्कमिंग वाढण्याची चिन्हे आहेत; पण त्यामुळे निष्ठावंतांच्या नाराजीने डोके वर काढू नये म्हणजे झाले. पक्षात नव्याने येणारे काही सतरंज्या उचलायला आलेले नाहीत हे उघड आहे, त्यामुळे त्यांच्या येण्याने पक्षातील काही जणांच्या संधी हिरावल्या जातीलच. त्यादृष्टीने पक्षसंघटनेत वर्चस्व राखणारा एक गट व महापालिकेच्या राजकारणात मिरासदारी मिरवणारा दुसरा गट या दोघांनाही नवीन भरती अडचणीची ठरू शकते. विशेषतः या पक्षातीलही नेत्यांचे प्रमाण वाढले असल्याने त्यांचा समतोल सांभाळणे हेच यापुढील काळात संपर्कप्रमुखांपुढील आव्हान ठरलेले दिसले तर आश्चर्य वाटू नये.

टॅग्स :Nashikनाशिक