शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
2
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
3
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
4
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
5
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
6
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
7
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
8
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
9
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
10
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर
11
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
12
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
13
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
14
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
15
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
16
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
17
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
18
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
19
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
20
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार

परतीच्या पावसाचा व्यावसायिकांना मोठा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2019 11:23 PM

वणी : नवरात्रोत्सव कालावधीत मोठी आर्थिक उलाढाल होईल या आशेने गुंतवणूक करणाऱ्या सप्तशृंगगडावरील व्यावसायिकांच्या पदरी निराशा पडली आहे. यंदा भाविकांच्या संख्येत घट झाल्याने व परतीच्या पावसाने कहर केल्याने व्यवसायावर परिणाम दिसून आला. त्यामुळे व्यावसायिकांचे डोळे आता कोजागरी पौर्णिमेकडे लागले आहेत.

ठळक मुद्देसप्तशृंगगड : भाविकांची संख्या रोडावल्याने कोजागरीवर आशा

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : नवरात्रोत्सव कालावधीत मोठी आर्थिक उलाढाल होईल या आशेने गुंतवणूक करणाऱ्या सप्तशृंगगडावरील व्यावसायिकांच्या पदरी निराशा पडली आहे. यंदा भाविकांच्या संख्येत घट झाल्याने व परतीच्या पावसाने कहर केल्याने व्यवसायावर परिणाम दिसून आला. त्यामुळे व्यावसायिकांचे डोळे आता कोजागरी पौर्णिमेकडे लागले आहेत.गडावर शेकडोच्या संख्येने विविध व्यावसायिक आहेत. उत्सव कालावधीत त्यांच्या संख्येत वाढ होते. यात्रोत्सव काळात व्यवसायाच्या माध्यमातून चार पैसे मिळतील अशा अपेक्षेने गुंतवणूक परताव्याच्या भरवशावर करण्यात येते; मात्र या खेपेस विविध आलेल्या अनपेक्षित संकटांमुळे व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला असल्याची माहिती ईश्वर कदम यांनी दिली.नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी गड व परिसरात पावसाने थैमान घातले होते. उत्सव काळातही पावसाने ठरावीक दिवसानंतर हजेरी लावली. त्यात एसटी बसचा अपघात झाला. तसेच नांदुरी-गड मार्गावर दरड कोसळली होती. अवघ्या तासभरात रस्त्यावरील अडथळे दूर करण्यात आले व वाहतूक सुरळीत झाली. यामुळे भाविकांच्या मनात चलबिचल झाली व याचा नकारात्मक परिणाम भाविकांवर झाला.फ्यूनिक्युलर ट्रॉली परिसरातील संकुलात सुमारे पन्नासच्या पुढे दुकाने आहेत. बहुतांशी भाविक ट्रॉलीत प्रवास करण्यास अग्रक्र म देतात. नारळ प्रसाद व इतर वस्तूंच्या दरवाढीचा परिणाम ग्राहकांवर होतो त्यामुळे तोही फटका बसल्याची माहिती सोमनाथ कोकाटे, रेखा जोशी, प्रमिला मोरे, रघुनाथ जोशी, गिरीश गवळी यांनी दिली. दिवाळी सण तोंडावर आला आहे, धंदाच नाही तर सण साजरा कसा करणार? त्यात उधार उसनवार करून, कर्ज काढून व्यवसायासाठी केलेली गुंतवणूक परतावा करणे अवघड झाले असून, नवरात्रोत्सवाच्या दोन ते तीन दिवसात थोडाफार व्यवसाय झाला तरी गुंतवणुकीच्या मानाने तो पुरेसा नसल्याने आर्थिक कोंडी झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.परराज्यासह राज्यातील भाविकांची संख्या कमीभाविकांच्या संख्येत घट झाल्याने व्यावसायिकांना ग्राहकाची वाट पहावी लागल्याची माहिती व्यावसायिक नाना कानडे यांनी दिली. महाराष्ट्रभर पावसाने थैमान घातले होते. पुणे, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदुरबार, सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई व गुजरात राज्यातही पावसाने कहर केल्याने तेथील प्रतिवर्षी येणारे भाविक गडावर आले नाहीत. त्याचा फटका सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना बसल्याची माहिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश बत्तासे यांनी दिली.

टॅग्स :saptashrungi templeसप्तश्रृंगी देवी मंदिरbusinessव्यवसाय