सायखेडा : हवामान खात्याने येत्या काही दिवसांत राज्यभर जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवल्याने जिल्ह्यातील द्राक्षबागायातदार धास्तावले आहेत. सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. जिल्ह्यातील खरीप पिकांसाठी जीवदान ठरलेला पाऊस परतताना नुकसान करण्याच्या भीतीने जिल्ह्यातील सर्वच शेतकरी चिंतित आहे. गेल्या दोन वर्षात बेमोसमी आणि अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे नुकसान झाले होते. त्यामुळे पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांनी यंदा गोडबार छाटणी काहीशी उशिराने सुरू केली. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सुरू होणारा हंगाम ऑक्टोबर महिन्यात सुरू झाला मात्र परतीच्या पावसाने गाठले, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. वर्षातून एकदा घेतले जाणारे द्राक्ष पिकाला मोठी गुंतवणूक करावी लागते. गेल्या चार दिवसांपासून निफाड तालुक्यात परतीचा पाऊस सुरू असल्याने शेतकरी संकटात सापटला आहे. हा पाऊस द्राक्षांना नुकसानीचा ठरत आहे. पावसामुळे घड जिरण्याची समस्या निर्माण होत आहे. काही बागा अद्याप छाटणी होऊन सुप्त अवस्थेत असल्यामुळे त्यांच्यातील घड परिपक्व नसल्याने बाहेर निघताना कमकुवत दिसत आहे. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्षबागांना बसला आहे. शेतकरी लाॉकडाऊनमुळे अडचणीचा सामना करत असातानाच पावसामुळे द्राक्षबागा धोक्यात आल्या आहेत. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी अशी मागणी होत आहे. फवारणीवर केलेला लाखो रुपयांचा खर्च वायाकाही बागा फुलोऱ्यात तर काही पोंग्यात आहे या बागांना फवारणी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. गुरुवारी सायंकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह तालुक्यात हजेरी लावल्याने फवारणी केलेली औषधे वाहून गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले तसेच वेळही खर्च झाला आहे.गेल्या दोन वर्षांपासून संकटाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्याला यंदाच्या हंगामातून अपेक्षा होती, मात्र पावसाने पाणी फेरले गेले आहे. कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेला लाॅकडाऊनमुळे आधीच शेतकरी पिचला आहे. यात परतीच्गा पावसाने नुकसान केल्याने शेतकरी संकटात सापडला आहेे.
परतीच्या पावसाने जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:39 AM
हवामान खात्याने येत्या काही दिवसांत राज्यभर जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवल्याने जिल्ह्यातील द्राक्षबागायातदार धास्तावले आहेत. सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. जिल्ह्यातील खरीप पिकांसाठी जीवदान ठरलेला पाऊस परतताना नुकसान करण्याच्या भीतीने जिल्ह्यातील सर्वच शेतकरी चिंतित आहे.
ठळक मुद्देबागांना दिवसरात्र फवारणी हंगाम उशिरा घेऊनही पावसाने अखेर गाठले; खर्चात वाढ