सिन्नर: रस्त्यावर सापडलेली पाच ग्रॅम वजनाची सोन्याची पोत प्रामाणिकपणे मूळ मालकास परत करण्यात आल्याची घटना पंचाळे येथे शिवाजी चौकात रविवारी सायंकाळी घडली. पंचाळे सोसायटीच्या विद्यमान उपाध्यक्ष इंदुबाई चांगदेव तळेकर या गावामध्ये भाजीपाला घेण्यासाठी शिवाजी चौकात आल्या होत्या. त्यावेळी शिवाजी चौकातील सिमेंट रोडवर त्यांच्या नजरेस रस्त्यावर पडलेली सोन्याची पोत नजरेस आली. त्यांनी तत्काळ त्यांचे जावई प्रभाकर बेलोटे यांना याची कल्पना दिली. बेलोटे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर अर्ध्या तासापूर्वी उभ्या असलेल्या मारुती गाडीचा शोध घेतला.
त्यांच्याशी मोबाइलवरून संपर्क केला. त्यावेळी ही चार चाकी शिंदेवाडी येथील किरण हांडोरे याची असल्याने समजले. त्यांच्याबरोबर त्याची आईबरोबर होती. त्यामुळे ही पोत चंद्रकला सारंगधर हांडोरे या महिलेची असल्याचे सिद्ध झाले. फोन करून या महिलेस व त्यांच्या मुलास पंचाळे येथे बोलावून घेतले. पाच ग्रॅम (२० हजार) रुपये किमतीची सोन्याची पोत हरवल्याने ही महिला शोक करत होती, परंतु हरवलेली पोत परत मिळाल्याने चंद्रकांत हांडोरे यांनी त्यांनी इंदुबाई तळेकर यांचे आभार व्यक्त केले. यावेळी तळेकर यांनी हांडोरे यांच्याकडे पोत सुपुर्द केली. यावेळी नंदू बेलोटे, किरण हांडोरे उपस्थित होते.
-------------
पंचाळे येथे सापडलेली सोन्याची पोत परत करताना इंदुबाई तळेकर, समवेत नंदू बेलोटे, किरण हांडोरे. (१० सिन्नर १)
===Photopath===
100521\10nsk_8_10052021_13.jpg
===Caption===
१० सिन्नर १