सायखेडा : निफाड तालुक्यात सलग दहा दिवसांपासून सुरु असलेला परतीचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सर्व शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. द्राक्ष बागा डाऊनी, भुरी, कुज, गळ, या रोगांनी शेतकऱ्यांच्या हातातुन गेल्याने लाखो रु पये खर्च करून द्राक्ष बागा लावलेला शेतकरी धास्तावला आहे तर सोयाबीन पीक शेतात उभे असल्याने अतिपावसाने उभ्या झाडाच्या शेंगातील दाण्यांना कोंब फुटू लागले आहे. भाजीपाला भुईसपाट झाला आहेयंदा सुरवातीपासून चांगला पाऊस पडत असल्याने द्राक्ष हंगाम जोरात राहील अशी शक्यता वर्तवली जात होती शेतकर्यांनी वेळेवर छाटणी केली, फेल काढणे , शेंडा मारणे, डिपिंग करणे अशी सर्व कामे सुरळीत पार पडली. ८० टक्के बागा फुलोरा, आणि मनी सेट स्टेजमध्ये आल्या होत्या. अशा काळात सिंचनाद्वारे देणारे पाणी सुद्धा बंद करावे लागते जास्त प्रमाणात पाणी झाले तर मनी गळ आणि कुज होते घड रिंग करतात. त्यात पाणी साठलं जाते आणि साठलेल्या पाण्याने कुज येऊन केवळ घडाचे दांड शिल्लक राहतात. या अपरीपक्व काळात बाग टिकविणे मोठे कसरतीचे काम असते याच दरम्यान जास्त बागा आहे. खूप पाऊस पडला त्यामुळे झाडाला एकही पाण्याचा थेंब नको असतो त्या काळात बागा पाण्याने तुडुंब भरल्या , झाडांनी दवं धरले, सूर्यप्रकाश मिळाला नाही, औषधांची फवारणी करणे जिकिरीचे झाले, अशा वेळी भयानक परिस्थितीती उदभवली आण िऐंशी टक्के बागा कुजून गेल्या. नाशिक जिल्ह्यातील सर्वात महागडे आणि खर्चिक पीक म्हणून द्राक्ष पिकाकडे पाहिले जाते. लाखो रु पये खर्च करून पीक उभे राहिले. यंदाच्या हंगामातील ऐंशी टक्के खर्च होऊन गेला अशा वेळी आलेल्या अस्मानी संकटाने काही क्षणात सर्व स्वप्न धुळीस मिळवले. परतीच्या पावसाने सायखेडा परिसरात सोयाबीन व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
परतीच्या पावसाने द्राक्षबागांना फटका, भाजीपाला भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 1:27 PM