नाशिक : गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने या दिवशी अनेकजण वाहन खरेदीला प्राधन्य देतात. त्यामुळे वाहनांच्या नोंदणीत प्रादेशिक परिवहन विभागाला दोन दिवसात 1 कोटी 19 लाख 47 हजार 618 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर व मुहुर्ताच्या दुसऱ्या दिवशीही विविध कंपन्यांच्या वाहन विक्रेत्यांनी विक्री झालेल्या वाहनांची नोंदणी करून घेतल्याने या दोन दिवसात तब्बल 617 वेगवेगळ्य़ा वाहनांची नोंदणी झाली आहे. गुढीपाडवा वाहनांच्या खरेदीसाठी सर्वाना लाभदायक मूहुर्त वाटत असल्याने नाशिककरांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांची मोठय़ा प्रमाणात खरेदी होत असल्याने दरवर्षी गुढीपाडव्याला प्रादेशिक परिवहन विभागाचे कार्यलय सुरु ठेवून वाहनांची नोंदणी करण्यात येते. यावषीर्ही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोठय़ा प्रमाणात वाहनांची खरेदी झाल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने दोन दिवसात तब्बल 617 वाहनांची नोंदणी केली आहे. यात 9 बसेससह 41 मालवाहू वाहने, 316 मोटार सायकल व स्कूटर, 12 मोपेड, 2 मोटर कॅब, 230 मोटर कार, 25 सीसीच्या 6 मोटराईज्ड सायकल, 1 रोडरोलर अशा एकूण 617 वाहनांची नोंदणी केली. यातून प्रादेशिक परिवहन विभागाला झाली आहे. दोन दिवसात 1 कोटी 19 लाख 47 हजार 618 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. यातील कर स्वरुपात एक कोटी 19 लाख 33हजार 216 रुपयांच्या करासह 14 हजार 402 रुपये दंडाच्या रकमेसह 1 कोटी 19 लाख 47 हजार 618 रुपयांचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.
230 चारचाकी वाहनांची नोंदणीपाडव्याच्या मुहूर्तावर चारचाकी व दुचाकी वाहन खरेदी करणा:या ग्राहकांचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यामुळेच दोन दिवसात तब्बव 230 चारचाकी वाहनांची नोंदणी झाली असून त्यातून एक कोटी चार लाख 49 हजार 866 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. तर विविध प्रकारच्या 336 दुचाकींच्या नोंदणीतून 10 लाख 17 हजार 563 रुपयांचा महसूल प्राप्त झाला असून 9 बसेसच्या नोंदणीतून 1 लाख 78 हजार 23 रुपये, मालवाहू वाहानाच्या नोंदणीतून 2 लाख 85 हजार 433, दोन मोटर कॅबपासून 33 हजार 165 व एक रोड रोलरच्या नोंदणीतून 5 हजार चारशे रुपयांचा महसूल प्राप्त झाल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिली आहे.