पंचवटी : संपूर्ण देशात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आल्याने सर्वच क्षेत्रात मंदीचे सावट पसरले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासकीय तसेच इतर अशासकीय खासगी कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. प्रादेशिक परिवहन कार्यालयातदेखील नवीन वाहन नोंदणी तसेच वाहनांसंबंधी कामे पूर्णपणे बंद होती. काही दिवसांपूर्वी शासनाने प्रादेशिक परिवहन कार्यालयात कामकाज सुरू करण्याचे आदेश दिल्यानुसार नवीन वाहन नोंदणीस सुरु वात करण्यात आली आहे.गेल्या आठवड्यात वाहन नोंदणी सुरू झाली आहे. पाच दिवसांच्या कालावधीत १४९ दुचाकी व १४५ नवीन चारचाकी वाहनांची नोंदणी करण्यात आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी दिली आहे. नवीन वाहन नोंदणी तसेच आॅनलाइन कर माध्यमातून प्रादेशिक परिवहन कार्यालयाला अवघ्या पाच दिवसांच्या कालावधीत सुमारे १ कोटी ६० लाख रुपयांचा महसूल जमा करण्यात आला आहे. कोरोना संसर्ग वाढल्याने लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम नवीन वाहन खरेदीवरदेखील झाला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयात नवीन वाहनांची नोंदणी कमी प्रमाणात झाल्यामुळे महसुलात घट झाली आहे.
पाच दिवसांत १ कोटी ६० लाखांचा महसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 11:47 PM
संपूर्ण देशात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आल्याने सर्वच क्षेत्रात मंदीचे सावट पसरले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासकीय तसेच इतर अशासकीय खासगी कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. प्रादेशिक परिवहन कार्यालयातदेखील नवीन वाहन नोंदणी तसेच वाहनांसंबंधी कामे पूर्णपणे बंद होती. काही दिवसांपूर्वी शासनाने प्रादेशिक परिवहन कार्यालयात कामकाज सुरू करण्याचे आदेश दिल्यानुसार नवीन वाहन नोंदणीस सुरु वात करण्यात आली आहे.
ठळक मुद्देपरिवहन विभाग : २९४ वाहनांची नोंदणी