सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे-पळसे येथील टोलनाक्यावर सिन्नरसह वीस किमीचा परिसर लोकल टोल म्हणून घोषित करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे यांनी शिंदे टोलनाका प्रशासनाला निवेदनाद्वारे केली आहे.
सिन्नर तालुक्यातील २० किलोमीटरमधील गावांना आतापर्यंत वीस रुपये लोकल टोल होता, तो अचानक टोल व्यवस्थापनाने ३५ रुपये केला. त्यामुळे वाहनधारकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. संगमनेर येथील टोलनाका स्थानिक वाहनधारकांना मोफत आहे. मग सिन्नर तालुक्यातील वाहनधारकांना वेगळा न्याय का? सर्व्हिस रोड (बायपास) वरील पथदीप व बोगद्यामधील आरसे बंद असल्याने महामार्गावर अपघात व चोरीचे प्रमाण वाढले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
-----------------
सोयी-सुविधांचा जाणवतो अभाव
बायपासवरील पाणी जाण्यासाठी गटारीचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. यामुळे रस्त्यांवरील पाणी परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये जाऊन अतोनात नुकसान होत आहे. या सर्व बाबी येत्या आठ दिवसांत काम व्यवस्थित करून दिल्या नाहीत तर सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व तालुक्यातील जनतेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
----------------
शिंदे येथील टोलनाका अधिकाऱ्यांना निवेदन देताना राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे. समवेत तालुक्यातील नागरिक व कर्मचारी. (०९ सिन्नर १)