नाशिक : यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत उत्कृष्ट जिल्हा परिषद आणि पंचायत समितींसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जिल्हास्तरावरील सर्व खातेप्रमुख व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेतला. या पुरस्काराच्या तयारीसाठी करावयाच्या उपाययोजना आणि सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत राज्यातील उत्कृष्ट जिल्हा परिषदा व पंचायत समितीसाठी पुरस्कार दिला जातो. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जिल्हास्तरावरील सर्व खातेप्रमुखांची व कर्मचाºयांची बैठक घेऊन आढावा घेतला. पंचायत राज संस्थेमधून प्रशासकीय व्यवस्थापन व विकासकामांबाबत जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांना यशवंत पंचायत राज अभियान योजनेंतर्गत पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या पुरस्कारासाठी जिल्हा परिषदांनी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात केलेल्या कामगिरीच्या अनुषंगाने पुरस्कार देण्यात येणार आहे.यासाठी शासनाने विविध विभागांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी निकष व मुद्दे असलेली प्रश्नावली दिली असून, त्याप्रमाणे सर्व विभागांनी तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश डॉ. गिते यांनी खातेप्रमुखांना दिले. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी याबाबत शासनाने काढलेल्या शासन निर्णयाबाबत माहिती देऊन गुणांकनाबाबत माहिती दिली. बैठकीस ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अरविंद मोरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बोधिकिरण सोनकांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, दत्तात्रय मुंडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर यांच्यासह सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या कामगिरीचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 4:46 PM