पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आमदार दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्व विभाग प्रमुखांच्या बैठकीत विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.बैठकीत पिंपळगाव बसवंत येथे उभारण्यात आलेल्या कोरोना सेंटरमध्ये साफसफाई, बिछाना व जेवणाविषयी काही नागरिकांच्या तक्र ारी आल्या असून त्याबाबत सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या. पोलीस विभागाने अवैध धंद्यांविषयी दक्षता घेत कारवाई करावी, तहसिल कार्यालयामार्फत नागरिकांना रेशन कार्ड वाटप करण्यात यावे, निफाड नगरपंचायतीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्र मा अंतर्गत ४.८० कोटी रूपयांचा निधी मंजूर झालेला असून त्याची निविदा प्रक्रि या लवकरात लवकर राबवावी, निफाड कारखान्यावर ड्रायपोर्ट मूल्यांकन संदर्भांत तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.याप्रसंगी निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे, नाशिक ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अरु ंधती राणे, निफाडचे तहसिलदार दीपक पाटील, निफाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी माधव रेड्डी, गटविकास अधिकरी डॉ.संदीप कराड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चेतन काळे, पोलीस उपअधिक्षक सचिन थोरबोले, निफाड नगरपंचायत मुख्याधिकारी पंकज गोसावी, प्रकल्प अधिकारी अभिमान माने, पोलीस निरीक्षक संजय महाजन, भगवान मथुरे, रंगराव सानप, सहायक पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ आदी उपस्थित होते.