लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शासनाने सन २०१७-१८ या वर्षात राज्यात तेरा कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठरविले असल्याने नाशिक जिल्ह्यासाठी देण्यात आलेल्या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाºयांनी वेळेत ते पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांनी केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात वन विभागातर्फे आयोजित बैठकीत जिल्हाधिकाºयांनी वृक्षलागवडीचा आढावा घेतला. शासकीय तसेच खासगी जागा, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करून देण्यात आलेली उद्दिष्टपूर्ती करावयाची आहे, यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा, नाशिक पश्चिम विभागाच्या उपवन संरक्षक श्रीमती बिवला, सर्व प्रांत अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर जिल्हाधिकाºयांनी जलयुक्त अभियानाचा तालुकास्तरीय आढावा घेतला. तालुक्यांना यापूर्वी दिलेल्या उद्दिष्टापैकी पूर्ण केलेल्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला.
वृक्षलागवडीचा जिल्हाधिकाºयांकडून आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 4:58 PM